ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
महाराष्ट्रमुंबई

८२८८ घरांसासाठी म्हाडाची लॉटरी


मुंबई/ घर घेण्यास इच्छुक असल्यासाठी एक खूश खबर आहे कारण म्हाडाच्या कोकण मंडळाच्या ८२८८ घरांसाठी १४ ऑक्टोबरला लॉटरी उघडली जाणार असून २३ऑगस्ट पासून फॉर्म ची विक्री सुरू होणार आहे .फॉर्म सोबत ५ हजार रुपये जमा करावे लागतील .तसेच पुढील ८ दिवसात मुंबईतील घरांच्या लॉटरीची ही म्हाडा घोषणा करणार आहे. कोकण विभागासाठी या लॉटरीत ठाणे,मिरा रोड,वर्तक नगर,विरार बोळींज नका,कल्याण,वडवली,गोठेघर येथे ही घरे उपलब्ध असतील.

मीरा रोड येथे२ बी एच के १९६ घरे आहेत. वर्तक नगर मध्ये ६७ दुकाने असतील ज्याची किंमत ३८ ते ४० लाख असेल,कासारवडवली येथे ३५० घरे ज्याची किंमत १६ लाख असून ही अल्प उत्पन्न गटासाठी आहेत.यंदा ६५०० घरे पंतप्रधान आवस योजनेतून,२हजार घरे ही मंडळाची तर ५०० घरे इतर प्रकल्पाचा भाग म्हणून समाविष्ट असतील

error: Content is protected !!