ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय

नवी दिल्ली येथील न्यू महाराष्ट्र सदन मध्ये ‘ग्लोबल ऑर्गेनिक एक्सपो’चा कार्यक्रम संपन्न….

दिल्ली -दिनांक ३ ऑगस्ट रोजी दिल्लीच्या न्यू महाराष्ट्र सदन या स्थळी ‘ग्लोबल ऑर्गेनिक एक्सपो’चे आयोजन करण्यात आलेला कार्यक्रम सफलतापूर्वक संपन्न.यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय अधिकारिता राज्यमंत्री मा.श्री.रामदासजी आठवले त्यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून संमेलनाचे उदघाटन केले. या कार्यक्रमात भारतातील १८ राज्यातून १०० हुन अधिक सेंद्रिय खाद्य उत्पादक चे मालक,डायरेक्टर, सेक्रेटरी, प्रोफेसर, विद्यार्थी, न्युट्रिशनिस्ट व विशेष उपस्थित शेतकरी आले होते त्यांनी स्व:ताचे मुद्दे आठवले साहेबांकडे मांडले.यात प्रामुख्याने सेंद्रिय शेती,आणि त्याच्याशी संबंधित असलेल्या समस्या आठवले यांच्या समोर मांडताना केंद्र सरकारने त्या समस्या सोडवण्यासाठी कशा प्रकारे मदत करायला हवी हे सांगितले मानवी आरोग्याच्या दृष्टीने सेंद्रिय पदार्थ आणि त्याचे उत्पादन तसेच मार्केटिंग यावर विशेष भर देण्यात आला. १ लाखापेक्षा जास्त शेतकरी सेंद्रिय खाद्याची शेती करत आहेत आणि १००० पेक्षा जास्त सेंद्रिय उत्पादनांची कंपनी मार्केटिंग आणि प्रोसेसिंग युनिटच्या स्वरूपात स्थापन झाल्या आहेत.
या कार्यक्रमाला आलेल्या वेगवेगळ्या राज्यातील तज्ञांनी आपली अभ्यासपूर्ण मते मांडली आणि केंद्र सरकारकडून त्यांना काय अपेक्षित आहे ते आठवले यांच्या समोर नमूद केले.आठवले यांनीही कृषी क्षेत्रासाठी सरकार कशा प्रकारे प्रयत्न करीत आहे आणि नव्याने केलेल्या कृषी कायद्याचा शेतकऱ्यांना किती आणि कसा फायदा होणार आहे ते सांगितले नव्या कायद्यामुळे शेतकऱ्यांना त्यांचा माल कुठेही विकण्यासाठी एक मुक्त अशी बाजारपेठ मिळाल्याने शेतकरी आनंदी आहेत असेही ते म्हणाले.केंद्र सरकारने जे तीन नावे कृषी कायदे केलेले आहेत ते देशातील कृषी उद्योग आणि शेतकऱ्यांच्या हिताचेच आहेत. त्यातून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल आणि शेतीचा विकास सुधा होऊ शकेल असे प्रतिपादन केले आहे.यावेळी त्यांनी मानवी आरोग्यासाठी सेंद्रिय शेती किती आवश्यक आहे याचेही महत्व पटवून दिले.
या कार्यक्रमाचे आयोजक नविन लादे, मनोज मिश्रा, नाजनीन अंसारी यांनी केले असून या भव्य कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य आयकॉनेक्स कंपनीचे संचालक राजीव बंसल, अभिमन्यू सिंग यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विम्मी चौधरी यांनी उत्कृष्ट पद्धतीने पार पाडला. कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न करण्यासाठी प्रविण गौड,सीमा यादव,दिपिका घाडी, आशिष मिश्रा व दिनेश तिवारी यांनी अतोनात मेहनत करून कार्यक्रम संपन्न झाला.या संमेलनाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला आणि ते यशस्वी झाल्याबद्दल आयोजकांनी सर्वांचे आभार मानले.

error: Content is protected !!