ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

स्कूल बसच्या ३० टक्के भाडेवाढीमुळे पालक चिंतेत

मुंबई -डिझेल वाढलेले भाव आणि कामगारांची पगारवाढ यामुळे स्कूल बस व्यवसाय चालवणे अवघड झाले आहे त्यामुळे स्कूल बसच्या भाड्यात ३० टक्के वाढ केली जाणार आहे

24 जानेवारीपासून राज्यातील शाळा सुरू झाल्यानंतर आता मुलांना शाळेत ने-आण करणाऱ्या स्कूल बस सुद्धा 10 फेब्रुवारी पासून पूर्णपणे सुरू होत आहेत. राज्य सरकारने स्कूल बसचा 2 वर्षचा रोड टॅक्स जरी माफ केला असला तरी वाढती महागाई, डिझेलचे वाढलेले दर आणि त्यात नियमानुसार 50 टक्के आसन क्षमतेने स्कूल बस सुरू होत असल्याने 30 टक्के भाडे वाढ करणार असल्याचे स्कूल बस मालक संघटनेने असल्याचे सांगितले. ‘स्कूल बस पुन्हा एकदा शाळा सुरु झाल्यानंतर सुरू होत असताना मागील दोन वर्षांपासून बस बंद होत्या त्यामुळे मेंटेनन्स खर्च, कर्मचाऱ्यांचे वाढते पगार हे सगळं विचारात घेता स्कूल बस मालकांनी शुल्क वाढ करायचे ठरवले आहे.’ अस स्कूल बस मालक संघटनेचे सचिव रमेश मनियन यांनी सांगितले.

त्यामुळे तुम्ही जर तुमच्या मुलांना स्कूल बसने शाळेत पाठवायला सुरू करणार असाल तर तुम्हाला 30 टक्के अधिकचा शुल्क मोजावे लागणार आहे. राज्यात साधारणपणे 44 हजार स्कूल बस महाराष्ट्रात तर मुंबईत सुद्धा साडे आठ हजारांच्या जवळपास स्कूल बस आहेत. मागील दोन वर्षापासून या स्कूल बस अनेक ठिकाणी बंद आहेत. स्कूल बस पुन्हा एकदा शाळा सुरु झाल्यानंतर सुरू होत असताना मेंटेनन्स खर्च कर्मचाऱ्यांचे वाढते पगार हे सगळं विचारात घेता स्कूल बसने शुल्क वाढ करायचे ठरवले आहे.

error: Content is protected !!