ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
महापालिकामुंबई

पालिकेच्या ढिसाळ नियोजनामुळे के ई एम मध्ये एकाच ठिकाणी तुफान गर्दी; कोरोनाला आमंत्रण -नोंदणी विभाग नंबर सोळा पोटात येतोय भीतीचा गोळा

मुंबई-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सतत सोशल डिशन्टन्स पाळा असे जनतेला उपदेश करीत असतात पण त्यांच्याच पक्षाची सत्ता असलेल्या मुंबई महानगर पालिकेच्या रुग्णालयांमध्ये पालिका आणि रुग्णालय प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे कशा प्रकारे सोशल डिसटीन्स नियमाची पायमल्ली सुरू आहे ते एकदा मुख्यमंत्र्यांनी के ई एम मध्ये येवून बघावे के ई एम मध्ये सर्व प्रकारच्या रुग्णांची नोंदणी एकाच ठिकाणी म्हणजेच १६ नंबर मध्ये होत असल्याने त्या ठिकाणी रोज सकाळी तुफान गर्दी उसळते या गर्दीत उपचारांसाठी येणाऱ्या काही करोना रुग्ण आणि केस पेपर काढण्यासाठी आलेले त्यांचे नातेवाईक सुधा असतात मुख्यमंत्री म्हणतात की एक करोना ग्रस्त ४०० लोकांना बाधित करू शकतो अशावेळी नोंदणीसाठी तुफान गर्दी करणाऱ्या लोकांमध्ये दोन चार जरी रुग्ण मिसळलेले असेल तरी किती लोकांना ते बाधित करू शकतात याची कल्पनाही करवत नाही . म्हणूनच नोंदणी विभागाचं विभाजन करण्याची आवश्यकता आहे अन्यथा काही खरे नाही असे तिथे हजार असलेल्या काही रुग्णांच्या नातेवाईकांनी सांगितले .
मुंबई महानगर पालिकेचे के ई एम हे सगळ्यात मोठे रुग्णालय आहे आणि तिथे रोज विविध रोगांचे किमान पाच हजार रुग्ण उपचारासाठी येत असतात त्यांची सुरुवातीला के ई एम मुख्य प्रवेश द्वारा समोरच असलेल्या १६ नंबरच्या विभागात नोंदणी करावी लागते तिथेच १० रुपयांची पावती आणि रुग्णांच्या वेग वेगळ्या आजरा नुसार असलेल्या खिडक्यांवर केस पेपर दिला जातो मात्र ही जागा फारशी मोठी नसल्याने आणि एकच ठिकाणी असलेल्या वेगवेगळ्या खिडक्यांवर केस पेपर मिळत असल्याने सकाळी तिथे कस्पेपर साठी तुफान गर्दी उसळते.सोमवारच्या दिवशी तर तिथे लांबच लांब रांगा लागून काही वेळा चेंग्रा चेंगरी होते त्यामुळे सोशल डिसन्टट च नियम के ई एम रुग्णालयासाठी शिथिल केलाय की काय असे वाटू लागते.सध्या करेनाचा प्रादुर्भाव जरी कमी झालेला असला तरी करोता गेलेला नाही तिसऱ्या लाटेची शक्यता आहे असे खुद्द मुख्यमंत्री सांगत आहे. पण पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेच्या आरोग्य विभागाचे मात्र त्याकडे जराही लक्ष नाही.त्यामुळे ह्या वाढत्या गर्दीला जर रोखले नाही तर के ई एम मधूनच पुन्हा कोरोणाचं स्फोट होऊ शकतो आश्चर्याची गोष्ट अशी की के ई एम चे जे अधिष्ठाता आहेत त्यांचे कार्यालय या १६ नंबर विभागाच्या बाजूलाच आहे आणि येत जाता त्यांना ही सगळी गर्दी दिसतही असेल म्हणूनच त्यांनी या गंभीर प्रकरणाची दाखल घेऊन १६नंबर नोंदणी विभागाचे विभाजन करून रोग निहाय आजूबाजूला नोंदणीची व्यवस्था करावी जेणेकरून एकाच ठिकाणी गर्दी होणार नाही अगोदरच के ई एम चे २२वैद्यकीय विद्यार्थी बाधित झाले आहेत त्यात आणखी इतर कर्मचारी व नोंदणीसाठी येणाऱ्या निरोगी माणसांची भर नको


बॉक्स/ आर टी पी सी आर टेस्ट साठी येणाऱ्यांना सुधा १६नंबरच्या गर्दीत जावे लागते आर टी पी सी आर टेस्ट साठी येणाऱ्या रुग्णांमध्ये काहींना कगेता ची लागण झाल्याची शक्यता असते यामुळे निदान त्यांच्यासाठी तरी नोंदणीची वेगळी व्यवस्था असायला हवी पण त्यांनाही १६ नंबरच्या गर्दीत जाऊन नोंदणी करण्याची सक्ती आहे जर त्यातील कोणी क रोना बांधित असला तर काय होईल याचा तरी के ई एम आणि पालिका प्रशासनाने विचार करायला हवा .

आर टी पी सी आर टेस्ट साठी येणाऱ्या रुग्णांमध्ये काहींना करोनाची लागण झाल्याची शक्यता असते यामुळे निदान त्यांच्यासाठी तरी नोंदणीची वेगळी व्यवस्था असायला हवी पण त्यांनाही १६ नंबरच्या गर्दीत जाऊन नोंदणी करण्याची सक्ती आहे जर त्यातील कोणी करोना बांचित असेल  तर काय होईल याचा तरी के ई एम आणि पालिका प्रशासनाने विचार करायला हवा
error: Content is protected !!