ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय

सोलापुरातील राष्ट्रवादीच्या आमदाराची ईडी कडून चौकशी

सोलापूर – सध्या महाविकास आघाडीतील शिवसेना आणि राष्ट्रवादीचे नेते इडीच्या रडारवर आहेत. यापैकी दोन मंत्र्यांची चौकशी होऊन ते तुरुंगात गेलेत तर काही नेत्यांची चौकशी होऊन कारवाईची प्रक्रिया सुरु झाली आहे. सोलापूर जिल्ह्यातील माढाचे आमदार बबनराव शिंदे आणि त्यांचे पुत्र रणजितसिंग शिंदे यांचीही इडी कडून चौकशी झाली आहे.
माढ्याचे आमदार बबनराव शिंदे यांनी साखर खात्यातील शेतकऱ्यांच्या नावावर परस्पर कर्ज उचललेले असा त्यांच्यावर आरोप आहे तसेच या प्रकरणाशी संबंधित इतरही काही गैरव्यवहार झाले आहेत जे ५०० कोटींच्या घरात आहेत . आणि याबाबतच्या तक्रारी आल्यामुळेच इडीने शिंदे पितापुत्रांची चौकशी केली आहे. आतापर्यंत इडी कडून अनिल देशमुख नवाब मलिक हसन मुश्रीफ अर्जुनराव खोतकर, भावना गवळी प्रताप सरनाईक आनंदराव अडसूळ आदी महाविकास आघाडीच्या नेत्याची चौकशी करण्यात आली आणि आता शरद पवार यांचे अत्यंत निकटवर्ती म्हणून ओळखले जाणारे माढाचे आमदार शिंदे आणि त्यांच्या पुत्राची इडी कडून चौकशी झाली आहे . त्यामुळे या चौकशीनंतर पुढे काय होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे .

error: Content is protected !!