[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

आम्हाला त्रास दिला तर मुंबईला जाणारे धान्य रोखू – जरंगे पाटलांचा सरकारला इशारा


जालना – येत्या २० जानेवारी रोजी मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील हे मुंबईत शेवटचं आंदोलन करणार असल्याची त्यांनी घोषणा केली. येत्या २० जानेवारीला मनोज जरांगे पाटील हे लाखो मराठ्यांसह मुंबईतील आझाद मैदानावर धडकणार आहेत. यासंदर्भात मुंबईत २० जानेवारी रोजी होणाऱ्या आमरण उपोषण आंदोलनाचा रोडमॅप मनोज जरांगे पाटील यांनी आज जालन्यात पत्रकार परिषद घेत सांगितला. दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेत आज सरकारला थेट इशारा दिल्याचे पाहायला मिळाले. मुंबईत येत्या २० जानेवारीला मनोज जरांगे पाटील हे आंदोलन करणार आहेत. या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी राज्यभरातून लाखो मराठे मुंबई दाखल होणार आहेत. या पार्श्वभूमीवर आंदोलनाला येणाऱ्या आंदोलकांना सरकारने अडवलं किंवा त्रास देण्याचा प्रयत्न केला तर मुंबईत जाणारं धान्य, दूध बंद करु, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. तर तुम्ही आम्हाला जसा त्रास द्याल, तसा तुम्हाला त्रास होईल, असा थेट इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी दिला. दरम्यान मुंबईला येणाऱ्या मराठा आंदोलकांचे १० टप्पेही जरंगे पाटील यांनी जाहीर केले आहेत. त्यामुळे सरकारची झोप उडाली आहे.

error: Content is protected !!