ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रराजकीय

फडणवीस दिवाळी नंतर बॉम्ब फोडणार

मुंबई/ ड्रग प्रकरणी नवाब मलिक यांनी केलेल्या गंभीर आरोपानंतर फडणवीस संतप्त झाले आहेत . मलिक यांनी लवंगी बार फोडून मोठा आवाज झाल्याचा आव आणला आहे पण मी मात्र दिवाळी नंतर मोठा बॉम्ब फोडणार आहे असे फडणवीस यानी सांगितले .
मलिक यांनी फडणवीस यांच्या पत्नीचा ड्रग पेडलर बरोबर चा फोटो शेअर केला होता मात्र तो चार वर्ष पूर्वीचा असून मार्च रिव्हर संस्थे साठी एक गाणे अमृताने रेकॉर्ड केले होते हे गाणे सचिन गुप्ता आणि जयदीप राणा याने तयार केले होते त्यावेळचा फोटो होता मात्र जयदीप बरोबर आमचा काहीच संबंध नाही असे सांगून फडणवीस यांनी आपल्यावरच आरोप फेटाळले . मात्र मलिक यांचे अंडरवर्ल्ड बरोबर संबंध असल्याचे पुरावे असून आपण ते शरद पवारांना देणार आहोत आणि दिवाळीला मोठा बॉम्ब फोडणार आहोत असे फडणवीस यानी सांगितले

error: Content is protected !!