ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
महाराष्ट्र

नवाब मलिक यांचा लवंगी बार की अटम बॉम्ब? फडणवीस हेच मास्टरमाईंड!

मुंबई/ आज पासून दिवाळीला सुरुवात होताच राजकीय अतिषबाजी उधाण आले आहे काल परवा पर्यंत फक्त लवंगी बार फुटत होते आता मात्र अटॅम बॉम्ब चे धमाके होऊ लागले आहेत.नेहमी प्रमाणे आज नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेतली .मात्र त्यात वानखेडे यांच्या ऐवजी थेट फडणवीस यांच्यावर हल्ला करून ड्रग प्रकरणाचे फडणवीस हेच मास्टर माईंड असल्याचा आरोप करून एका ड्रग पेडलर बरोबर चां अमृता फडणवीस यांचा फोटोचा शेअर केल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली . दरम्यान मलिक हे लवंगी बार फोडून मोठा आवाज आल्याचा देखावा निर्माण करीत आहेत मात्र दिवाळी नंतर मी बॉम्ब फोडणार आहे असे म्हणून फडणवीस यानी पलटवार केलाय .
आज मलिक यांनी जयदीप राणा या ड्रग पेडलर बरोबर असलेला अमृता फडणवीस यांचा फोटो शेअर करून भाजपचे ड्रग माफिया लोकांशी संबंध असल्याचा गंभीर आरोप करू महाराष्ट्रात फडणवीस यांच्या मुळेच ड्रगच खेळ सुरू आहे असे म्हटले होते इतकेच नव्हे तर नीरज पांडे हा फडणवीस यांचा माणूस असल्याचंही आरोप केला होता आणि मुख्य म्हणजे फडणवीस यांच्या इशर्यावरूनाच वानखेडे यांची वेग वेगळ्या खात्यात बदली झाल्याचेही मलिक यांनी सांगितले

त्यांच्या या आरोपानंतर फडणवीस यानी पलटवार करताना .मी काचेच्या घरात राहत नाही मलिक यांचे कशा प्रकारे अंडर वर्ल्ड बरोबर संबंध आहेत . याची सर्व माहिती मी पवारांना देणार आहे .तसेच माझ्या पत्नीचा तसेच त्यांनी जयदीप राणा बरोबरच माझ्या पत्नीचा फोटो दाखवून आपली मानसिकता दाखवून दिली आहे .त्या फोटो बद्दल बोलताना त्यांनी सांगितले की रिव्हर मार्च या नद्यांच्या p पुनर जिवण काम करणाऱ्या एका संघटनेशी त्यांच्या अध्यक्षांनी केलेल्या विनंतीवरून आणि जोडलो गेलो होतो . त्यांनी एक गाणे तयार केले होते त्या गाण्याच्या वेळी हे फोटो काढले जे चार वर्षा पूर्वीचे आहेत आणि त्यांच्या टीमने हयार केलेला तो माणूस होता त्याला आम्ही ओळखत नाही . याबाबतचा खुलासा रविवारीच रिव्हर मार्च ने केलाय राहता राहिला सवाल नीरज पांडे याचा तर त्याला मी ओळखतो पण माझ्यापेक्षा जास्त त्याला उद्वव ठाकरे ओळखतात आणि मी जितक्या वेळी मातोश्रीवर गेलो नसेन तितक्या वेळी नीरज जाऊन आलाय मलिक यांनी हवे तर मुख्यमंत्र्यांना विचारावे .भाजपा नेत्यांनीही मलिक यांनी फडणवीस यांच्यावर केलेल्या आरोपाबद्दल मलिक यांची खरडपट्टी काढलीय त्यामुळे हा वाद आता कोणाला खुटे पोचवतो हे नजीकच्या काळात कळेल

error: Content is protected !!