ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
गुन्हेमुंबई

निलंबित सपोनी सचिन वाझे यांना ०६/११/२०२१ पर्यंतची पोलिस कोठडी सुनावली

मुंबई- आझाद मैदान पोलिस ठाणे हद्दीत किल्ला कोर्ट येथे गुन्हे प्रकटीकरण कक्ष ११ह्यांनी नोंदविलेल्या गुन्हा रजिस्टर क्र ७१/२१ कलम ३८२,३८५,३८८,३८९, १२० ब ३४ भादवि या गुन्ह्यांमध्ये अटक केलेले निलंबित सपोनि सचिन वाजे यांना रीमांडकामी न्यायाधिश श्रीमती शेख सुट्टी कालीन मुख्य महानगर दंडाधिकारी , एस्पलनेड कोर्ट क्रमांक ३७ (किल्ला कोर्ट) दरम्यान पोलीस बंदोबस्तात आणले होते.
सदर वेळी आरोपी चे वकील आणि सरकारी वकील श्री. जगताप यांनी आप आपली बाजू मांडली.
त्यानंतर न्यायाधिश महानगर दंडाधिकारी , एस्पलनेड कोर्ट क्रमांक ३७ (किल्ला कोर्ट) यांनी निलंबित सपोनी सचिन वाझे यांना ०६/११/२०२१ पर्यंतची पोलिस कोठडी सुनावली आहे .

error: Content is protected !!