ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
गुन्हेताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोरोना काळातील आरोग्य दूत निघाला गुटका माफिया

नाशिक – सध्या नाशिक ग्रामीण पोलिसांची एक कारवाई चांगलीच चर्चेचा विषय ठरत आहे. अनेक राजकीय व्यक्ती तसंच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत वावर असलेला आणि स्वतःला आरोग्यदूत म्हणवून घेणारा तुषार जगताप हा चक्क गुटखा माफिया निघाला आहे. परराज्यातील साथीदारांच्या मदतीने तो महाराष्ट्रातील गुटख्याचे अवैध नेटवर्क चालवत असल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे.
२६ मे २०२३ रोजी इगतपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुटख्याने भरलेल्या दोन कंटेनरमधून सव्वा कोटींचा अवैध गुटखा पोलिसांनी जप्त केला होता. यातील मुख्य आरोपी आणि जवळपास तीन वर्षांपासून अनेक गुन्ह्यात फरार असलेल्या राज किशनकुमार भाटिया याला राजस्थानच्या जयपूरमधून गेल्या आठवड्यात अटक करण्यात आली होती. राज भाटिया हा दिल्ली आणि जयपूरमधून सूत्रे हलवून बंद कंटेनरमध्ये गुटखा लपवत देशातील विविध राज्यांमध्ये गुटख्याची तस्करी करतो. दरम्यान राज भाटियाची सखोल चौकशी सुरु असतानाच२०२१ पासून तो तुषार जगतापच्या मदतीने महाराष्ट्रातील गुटख्याचे अवैध नेटवर्क चालवत असल्याची कबुली त्याने दिली आणि त्यानुसार तुषार जगतापला इगतपुरी पोलिसांनी मंगळवारी बेड्या ठोकल्या आहेत. दरम्यान तुषारच्या अटकेमुळे गुटखा तस्करीची राज्यातील पाळेमुळे खोदण्यास पोलिसांना मदत होणार आहे.

error: Content is protected !!