ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

पुणे अपघातातील अल्पवयीन आरोपीच्या चौकशीची पोलिसांना परवानगी

पुणे : पुणे पोर्शे अपघात प्रकरणातमोठी अपडेट समोर आली आहे. पुणे पोलिस आता अल्पवयीन मुलाची चौकशी करणार आहे. पुणे पोलिसांना अल्पवयीन मुलाची चौकशी करण्याची परवानगी मिळाली आहे. पुणे पोलिसांना बाल हक्क न्याय मंडळाकडून अल्पवयीन मुलाचीची चौकशी करण्याची पुणे पोलिसांना परवानगी मिळाली आहे. यानंतर आता शनिवारी दोन तास अल्पवयीन मुलाचीची चौकशी करण्यात येणार आहे. पालक उपलब्ध नसल्याने बालहक्क न्याय मंडळाच्या सदस्याच्या उपस्थितीत गुन्हे शाखेकडून ही चौकशी होणार असल्याची माहिती समोर आली आहे
पुणे पोलिसांच्या क्राईम ब्रांच उद्या अल्पवयीन मुलाचीची चौकशी करणार आहेत. सहाय्यक पोलिस आयुक्त आणि दोन महिला पोलिसांकडून अल्पवयीन मुलाची चौकशी करण्यात येणार आहे. अल्पवयीन मुलाने दोघांना भरधाव पोर्शे कारने चिरडलं होतं. अपघातानंतर अल्पवयीन मुलाची कोणतीही चौकशी झाली नव्हती किंवा कोणताही जबाब नोंदवण्यात आला नव्हता. पुणे पोलिसांनी बाल हक्क न्याय मंडळाला पत्र लिहून अल्पवयीन मुलाच्या चौकशीची परवानगी मिळण्यासाठी मागणी केली होती. त्यानंतर आता बाल हक्क न्याय मंडळाने पोलिसांना चौकशीसाठी परवानगी दिली आहे.
पुणे पोलिसांची क्राईम ब्रांच टीम दोन तास अल्पवयीन मुलाची चौकशी करणार आहेत. या प्रकरणात आतापर्यंत अनेकांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. या अल्पवयीन मुलासोबत कारमध्ये असलेल्या मित्रांचेही जबाब नोंदवण्यात आले होते, मात्र अल्पवयीन मुलाचा जबाब नोंदवण्यात आला नव्हता. आता बाल हक्क न्याय मंडळाच्या परवानगीनंतर पुणे क्राईम ब्रांचची टीम बालसुधारगृहात जाऊन अल्पवयीन मुलाची चौकशी करणार आहेत. दोन तास चौकशी होणार असल्याची माहिती आहे.
या चौकशीदरम्यान अल्पवयीन मुलाला घटनेसंबंधित अनेक प्रश्न विचारले जातील. बाल हक्क न्याय मंडळाचा एक सदस्य चौकशीच्या वेळी उपस्थित असतील. न्यायालयाने अल्पवयीन मुलाच्या पालकांना उपस्थित राहण्यास सांगितल आहे. मात्र, अल्पवयीन मुलाचे वडील कोठडीत आहेत आणि आई अज्ञातवासात आहे. अल्पवयीन मुलाच्या भावाला देखील पत्र पाठवून चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगण्यात आलं आहे.
दरम्यान अल्पवयीन मुलाचे कुटुंबिय चौकशीसाठी उपस्थित राहिले नाही, तरी बाल हक्क न्याय मंडळाचे सदस्य या चौकशीच्या वेळी उपस्थित राहतील आणि शनिवारी दोन तास अल्पवयीन मुलाची चौकशी पार पडणार आहे

.

error: Content is protected !!