ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्र

हिन्दू शांत असेल तरी कमजोर नाहीत

मुंबई/ सध्या त्रिपुरा येथील घटनेचे निमित करून काही मुस्लिम संघटनांनी महाराष्ट्रात हिंसक हैदोस घालण्याचा प्रयत्न केला यावेळी व्यापाऱ्यांना टार्गेट करून त्यांच्या दुकानाची तोडफोड केली वास्तविक सरकारने अशा लोकांवर तात्काळ कारवाई करायला हवी होती पण सरकार गप्प आहे पण सरकार गप्प तरी ज्यांच्यावर हल्ले होत आहेत ते हिंदू मात्र गप्प राहणार नाहीत कारण हिंदू शांत असेल तरी कमजोर नाहीत हे दंगलखोरांनी लक्षात ठेवावे असा इशारा मुंबईचे माजी उप महापौर आणि भाजप नेते बाबूभाई भवणजि यांनी दिला आहे
  बाबूभाई पुढे म्हणाले की बंगला देशात हिंदूंची घरे जाळली संपत्ती लुटली पण इथल्या कुठल्याही हिंदूंनी याबाबत मुस्लिम बांधवांना जबाबदार धरले नाही किंवा त्यांच्यावर अन्याय केला नाही पण त्रिपुरा येथे मस्जिद पडल्याच्या कथित घटनेचे महाराष्ट्रात पडसाद उलटले आणि मुस्लिम संघटनांनी पोलिसांची परवानगी नसताना मालेगाव,नांदेड आणि अमरावती मध्ये मोर्चे काढले यावेळी पोलिसांवर तसेच हिंदूंच्या मालमत्तांवर हल्ले केले त्याच  निषेधार्थ भाजपने शांततेत अमरावती मध्ये बंद पाळला त्यांच्यात आणि आमच्यात हाच फरक आहे मात्र हे आम्ही किती दिवस सहन करायचे त्रिपुरा मधील घटनेशी इतल्या मुस्लिमांनाही काय संबंध उद्या पाकिस्तान किंवा जगाच्या इतर भागात काय घडले तर त्याबाबत सुधा भारतीयांना जबाबदार धरणार आहात का? सरकारने याबाबत तातडीने पावले उचलून दंगलखोरांना अद्दल घडेल अशी कारवाई करावी अशी मागणी बाबूभाई केली आहे
error: Content is protected !!