[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
महाराष्ट्र

महाराष्ट्रात रात्रीची संचारबंदी?ओणम मुळे केरळ मध्ये पाच दिवसात दीड लाख रुग्ण वाढले


मुंबई/सनावराच्या दिवसात अधिक खबरदारी घेतली नाही तर काय घडू शकते याचा प्रत्यय केरळ मध्ये आला असून तेथे ओणम सण साजरा करताना झालेल्या गर्दीमुळे अवघ्या पाच दिवसात दीड लाख करोना रुग्ण वाढलेत म्हणूनच आता महाराष्ट्रात खबरदारीचा उपाय म्हणून रात्रीची संचारबंदी लावण्याचा विचार सुरू आहे .
कगेताची तिसरी लाट तोंडावर असल्याने सणासुदीच्या काळात आवश्यक ते निर्बंध घाला अशा सूचना केंद्र सरकारने दिल्या आहेत कारण केरळ महाराष्ट्र आणि कर्नाटक या तीन राज्यांमध्ये करोना रुग्णांची संख्या वाढत आहे म्हणूनच महाराष्ट्र सरकारने दहीहंडी उत्सव करण्यास परवानगी नाकारली तर गणेशोत्सवावर अनेक निर्बंध लादले आहेत . आता केरळ मध्ये रुग्ण वाढल्याने महाराष्ट्रात सुधा तशी परिस्थिती येऊ नये म्हणून रात्रीच्या साचार बंदी चां विचार सुरू असल्याचे समजते .

error: Content is protected !!