ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

हनी ट्रॅप मध्ये अडकून पाकिस्तान साठी हेरगिरी करणाऱ्या डॉकयार्ड मधील अभियंत्याला अटक

ठाणे/पाकिस्तानी गुप्तहेर महिलेच्या हनी ट्रॅपचे आणखी एक खळबळजनक प्रकरण आता समोर आले आहे.यामध्ये भारतीय नौदलाची गोपनीय माहिती पुरविणाऱ्या मुंबई डॉकयार्डमधील अभियंता तंत्रज्ञ रविकुमार वर्मा (वय ३५, रा. कळवा, ठाणे) याला राज्याच्या दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) कडून गुरुवारी अटक झाली आहे. त्याच्या संपर्कातील दोघांविरुद्ध शासकीय गुपिते अधिनियमाखाली (युएपीए) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोपनीय माहिती पुरविल्यानंतर पाकिस्तानातून मोठी रक्कमही त्याच्या बैंक खात्यात जमा झाल्याची माहितीही समोर आली आहे.
मुंबईतील डॉकयार्ड येथील एक कर्मचारी पाकिस्तानी इन्टेलिजन्स ऑपरेटिव्हच्या (पीआयओ) संपर्कात असून, त्याने भारत सरकारने प्रतिबंधित केलेली गोपनीय व संवेदनशील माहिती त्यांना पुरविल्याची एटीएसच्या मुंबई पथकाला मिळाली.त्या आधारे एटीएसच्या पथकाने या कर्मचाऱ्याची चौकशी केली. त्यामध्ये नोव्हेंबर २०२४ मध्ये फेसबुकद्वारे एका पीआयओशी त्याची ओळख झाल्याचे स्पष्ट झाले.
नोव्हेंबर २०२४ ते मार्च २०२५ या कालावधीत याच पीआयओला व्हॉटसअॅपद्वारे भारताने प्रतिबंधित केलेल्या क्षेत्रातील गोपनीय माहिती वेळोवेळी पुरविल्याचे उघड झाले. हा प्रकार उघड झाल्यानंतर वर्मा याला २८ मे रोजी कळव्यातून अटक करण्यात आली. सखोल चौकशीनंतर त्याच्याच संपर्कातील अन्य दोघांनाही अटक करण्यात आली आहे.
वर्मा हा डॉकयार्डमध्ये कनिष्ठ अभियंता तंत्रज्ञ म्हणून ठेकेदारीवर त्याच्याशी मैत्री केली आणि भारतीय नौदलातील महत्त्वाची गुपिते व्हॉटसअ पद्वारे काढून घेतली, तो अविवाहित असून, ठाण्याच्या कळच्यातील स्वतःच्या मालकीच्या घरात वास्तव्याला होता. त्याने दिलेल्या माहितीनंतर पाकिस्तानच्या त्याच्या मैत्रिणीने त्याच्या बँक खात्यात मोठी रक्कम जमा केल्याची माहिती चौकशीत उघड झाली. त्याला नेमकी किती आणि कोणाकडून ही रक्कम मिळाली, त्याने आणखी कोणती माहिती दिली, या सर्व बाबींचा तपास एटीएसकडून करण्यात येत आहे
यापूर्वी १२ मार्च २०२४-प्रतिबंधित क्षेत्रांबद्दल गोपनीय माहिती शेअर केल्याबद्दल माझगाव डॉक शिपबिल्डर्सचा कंत्राटी कामगार कल्पेश बायकर याला अटक करण्यात आली. पाकिस्तानी एजंटने नोव्हेंबर २०२१ ते मे २०२३ दरम्यान फेसबुक आणि व्हॉट्सअॅपद्वारे संपर्क साधून त्यांच्याकडून माहिती मागवली. त्याला नवी मुंबईतून ताब्यात घेतले होते. तो २०१४ पासून डॉकयार्डमध्ये काम करत होता.

१२ डिसेंबर २०२३: गोपनीय व संवेदनशील माहिती पाकिस्तानी इंटेलिजेंस ऑपरेटिव्ह (पीआयओ) एजंट्सना पुरवून त्यांच्याकडून पैसे घेणाऱ्या भारतीय नौदलाच्या डॉकयार्डमधील प्रशिक्षणार्थी तरुण गौरव पाटील (२३) गेल्या पाच वर्षांपासून नोकरी करीत होता. मागील दोन वर्षांपासून तो पाकिस्तानी गुप्तहेर महिलेच्या संपर्कात आला तिने त्याला प्रेमाच्या जाळ्यात ओढले होते. पाकिस्तानी एजंट आणि त्याला ते जहाजे रिपेरिंग करणाऱ्या कंपनीचे एजंट असल्याचे सांगितले होते. एटीएसने कारवाई केली.

क्षेत्रातील हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या सुविधेतील सहायक पर्यवेक्षक दीपक शिरसाठ यांना आयएसआय हँडलरला भारतीय लढाऊ विमानांबद्दल गोपनीय माहिती पुरवल्याच्या आरोपाखाली अटक केली. साहित्याची तपासणी करणाऱ्या शिरसाठ यांनाही हनी ट्रॅपमध्ये अडकवण्यात आल्याचा संशय होता. ऑक्टोंबर 2020 : भारताच्या संरक्षण क्षेत्रातील संवेदनशील माहिती पाकिस्तानी गुप्तचरांना पुरविल्याप्रकरणी एटीएसली डीआरडीओचे संचालक डॉ. प्रदीप कुरुलकर यांना यापूर्वी अटक करण्यात आली होती.

error: Content is protected !!