ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्र

बंगलादेशाच्या दुर्गापूजा मंडपांच्या तोडफोडीच्या अलीकडच्या घटनांनंतर त्रिपुरामध्ये दंगल सुरू

हिंदू संघटनांकडून हल्ल्यांची सुरूवात
बांगलादेशातील दुर्गापूजा मंडपांच्या तोडफोडीच्या अलीकडच्या घटनांनंतर त्रिपुरामध्ये दंगल सुरू झाली.
अगरतळा -बांगलादेशमध्ये जवळपास 70 अल्पसंख्यांक हिंदूंच्या घरांवर हल्ले करण्यात आले. त्यानंतुर त्रिपुरामधल्या हिंदू संघटनांनी मशिदी, मुस्लिम लोकांचा घरे आणि दुकानांवर हल्ल्यांना सुरूवात केली.

21 ऑक्टोबर रोजी बांगलादेशातील घटनांच्या विरोधात गोमती जिल्ह्यातील उदयपूर येथे विश्व हिंदू परिषद आणि हिंदू जागरण मंचच्या कार्यकर्त्यांची रॅली झाली होती. या रॅलीमध्या कार्यकर्त्यांची पोलिसांशी चकमक होऊन तीन पोलिस कर्मचार्‍यांसह 15 जण जखमी झाले होते. या घटनांनी त्रिपुरामधल्या कर्फ्यूचे निर्बंध मोडले होते.

error: Content is protected !!