ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

माहीम मध्ये काशी विश्वेश्वर मंदिरात देवांच्या मुर्त्यांची चोरी


मुंबई/ माहीम येथील काशी विश्वेश्वर मंदिरातील पाच मुरत्यांची चोरी झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून यातील दोन मुर्त्या एका विश्र्वस्ताच्या फार्म हाऊसवर सापडल्याने पोलिसांनी या प्रकरणी सर्व विश्वस्तांना चौकशीसाठी बोलावले आहे या घटनेमुळे संपूर्ण मुंबईत मोठी खळबळ माजली आहे
माहीम येथील हे मंदिर २३६वर्ष पुरातन असून त्यात नंदी,कासव,पार्वती,शिवलिंग व शितलादेवी आदी पाच मुर्त्या होय . मात्र त्या चोरीला गेल्याचे समजताच भाविकांनी मंदिराकडे धाव घेतली दरम्यान या मुर्त्या बदलण्यात आल्याचे सांगण्यात आले . पण याबाबतची कोणतीही माहिती भाविकांकडून नव्हती भाविकांनी या प्रकरणी धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार केली असता . धर्मादाय आयुक्तांनी सुधा विश्वस्त मंडळाच्या विरुद्ध अहवाल दिला आहे . चोरीची ही घटना आजची नसून फार पूर्वीची आहे मात्र त्याला गेल्या दोन दिवसात वाचा फुटली आता या प्रकरणी पोलीस विश्वस्तांनी चौकशी करीत आहेत .

error: Content is protected !!