दहशतवाद्यांच्या भारत विरोधी रॅलीत पाकिस्तानचे मंत्री
लाहोर/पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला होऊन एक महिना उलटला, महिन्यानंतर, हल्ल्याचा मास्टरमाइंड सौफुल्लाह कसुरी हा पाकिस्तानमधील एका रॅलीत सामोर आला आहे. सैफुल्लाह हा लष्कर-ए-तोयबाचा कमांडर आहे. दरम्यान, लष्करचा पुढचा उत्तराधिकारी मानला जाणारा हाफिज सईदचा मुलगा देखील सैफुल्लाहसोबत दिसला. यात अनेक पाकिस्तानी नेते देखील दिसाले. ह उघाडापायों दहशतवाद्यांसह स्टेज शेअर करत आहोत.
अणुचाचणीच्या यशाचा गौरव दरवर्षी पाकिस्तानमध्ये ‘यूम-ए-तकबीर’ म्हणून साजरा केला जातो. ही रॅली देखील याच उत्सवाचा एक भाग होती. यावेळी पाकिस्तान मरकझी मुस्लिम लीगने आयोजित केलेल्या दहशतवाद्यांनी भारताविरुद्ध विष ओकले. रॅलीमध्ये उपस्थित असलेला तल्हा सईद पहलगामच्या बैसरनमध्ये झालेल्या हल्ल्याचे नेतृत्व करत असल्याचा आरोप आहे
२२ एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी २६ जणांची निघृण हत्या केली. या दरम्यान दहशतवाद्यांनी लोकांना त्यांच्या धर्माबद्दल विचारले आणि नंतर गोळ्या झाडल्या. या हल्ल्याची जबाबदारी द रेझिस्टन्स फ्रंट नावाच्या गटाने घेतली होती, त्यानंतर भारताने ‘ ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील अनेक दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले. या कारवाईदरम्यान भारतीय सशस्त्र दलांनी १५० हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला.
पाक मध्येझालेल्या या भारतविरोधी रॅलीमध्ये, मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांच्या यादीत समावेश असलेल्या तल्हा सईदने जिहादी घोषणा दिल्या. तल्हा सईदने पाकिस्तानमध्ये निवडणकही लढवली आहे.
