ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

आणखी एक मंत्र्यावर गुन्हा दाखल


अहिल्यानगर : राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अडचणी वाढल्या असून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के यांच्यासह ५४ जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आल्याने जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. साखर कारखाना कर्जमाफी प्रकरणात ९ कोटींच्या अपहार प्रकरणी लोणी पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल झाला
शेतकऱ्यांच्या नावे राष्ट्रीयकृत बँकांकडून कर्ज घेऊन शेतकऱ्यांना वितरित न केल्याचा आरोप मंत्री महोदयांवर ठेवण्यात आला आहे. सन २००४, २००५आणि२००७ साली अपहार केल्याचे दाखल फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. कारखान्याच्या तत्कालीन संचालक मंडळावर गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी प्रवरा कारखान्याचे सभासद बाळासाहेब केरूनाथ विखे यांनी थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. अखेर, सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर विखे पाटलांसह पाटलांसह ५४ जणांवर भादंस कलम ४१५,४२०,४६४, ४६५ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामुळे आता फडणवीस सरकारच्या अडचणीत वाढ झाली आहे .कारण यापूर्वी महायुती सरकारमधील एक मंत्री माणिकराव कोकाटे यांना न्यायालयाने दोषी ठरवून शिक्षा दिली होती. मात्र कोकाटेही अजून मंत्रिमंडळात आहे .त्यानंतर आता राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाने आदेश दिले आहेत .त्यामुळे कोकाटे आणि विखे पाटील या दोघांना मंत्रिमंडळातून हटवण्याची मागणी केली जात आहे.

error: Content is protected !!