[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

तत्कालीन  पालकमंत्र्यांच्या काळात कामे न करता ७ ३ कोटींची बिले वसूल केली धस यांचा धनंजय मुंडेंवर आरोप

परळी – बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर सध्या वातावरण ढवळून निघालं आहे. या प्रकरणावरुन मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरु लागली आहे. त्यातच आता भाजप आमदार सुरेश धस यांनी नुकंतच पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. “परळी आणि अंबाजोगाईत काम न करता बिलं उचलण्यात आली. धनंजय मुंडे पालकमंत्री असताना अनेक बोगस बिल उचलली”, असा आरोप सुरेश धस यांनी केला.
सुरेश धस यांनी पत्रकार परिषद घेत धनंजय मुंडेंवर अत्यंत गंभीर आरोप केले. “परळी आणि अंबेजोगाई येथील कामे न करता कोट्यवधी रुपयांची बिले उचलली”, असा आरोप सुरेश धस यांनी केला.
“पालकमंत्रीपद भाड्याने दिलं होतं. त्या कालावधीत काही, कोण कोण कार्यकारी अभियंता, जेई. यात मला वाटतं मीडियाची मेमरी स्ट्राँग असेल. एक कार्यकारी अभियंता कोकणे म्हणून त्याने जिल्हाधिकाऱ्याने पिस्तुल मागितलं होतं. यावर सध्याचे मुख्यमंत्री आणि तत्कालीन विरोधी पक्षनेत्याने सभागृहात टिप्पणी केली होती. डीपीडीसीतून २०२१ ते २०२२ अंतर्गत यावेळी पालकमंत्री धनंजय मुंडे होते. कोरोनाचा कालावधी. परळी आणि अंबेजोगाई येथील कामे न करता कोट्यवधी रुपयांची बिले उचलली”, असे सुरेश धस यांनी म्हटले.

error: Content is protected !!