[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

आमची कुणाशी ही युती नाही-राज ठाकरे

कोल्हापूर/ आगामी महापालिका निवडणुकीत माझा पक्ष कुणाशीही युती करणार नाही आम्ही स्वतंत्रपणे निवडणूक लढू अशी घोषणा राज ठाकरे यांनी केली आहे त्यामुळे राज शिंदे गट किंवा भाजप सोबत जाणार या चर्चवर आता पडदा पडला आहे.
राज ठाकरे यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेतली त्यात अनेक विषयांवर आपली भूमिका मांडली राज्यपालांना कुणीतरी दुसरा स्क्रिप्ट लिहून देत असावा आणि मुळ प्रश्नावरून लोकांचे लक्ष हटवण्यासाठी राज्यपाल वादग्रस्त विधाने करीत आहेत. असा संशय व्यक्त करीत सीमा वादाचा प्रश्न न्यायालयात प्रलंबित असताना अचानक हा प्रश्न का उपस्थित करण्यात आला यात सुधा लोकांचे मूळ प्रश्नावरून लोकांचे लक्ष हटवण्याचा प्रयत्न असावा असा राजने संशय व्यक्त केला . उद्धव ठाकरेंवर केलेल्या मिमिक्री बद्दल बोलताना ते म्हणाले की आपण त्यांच्या आजारावर बोललो नाही केवळ परिस्थितीवर बोललो कारण करोना काळात ते कोणाला भेटत नव्हते आता मुख्यमंत्रीपद जाताच त्यांचा आजार कसा काय पाळला असेही ते म्हणाले तसेच मी दुसऱ्यासाठी काम करतो असे म्हटले जाते पण मी माझा पक्ष आणि मी महाराष्ट्रासाठी काम करतोय असे सांगितले

error: Content is protected !!