[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
गुन्हेमुंबई

डिलाईल रोडच्या कडदोडी चाळीत, एकाच रात्री दोन घरफोड्या

मुंबई- दिवाळीच्या तोंडावर आजकाल मुंबईत चोर्‍या लुटमार घरफोड्या यांचे प्रमाण वाढले असून डिलाई रोड येथील कडदोडी चाळीत बुधवारी दिंनाक- 27 आक्टोबर 2021 रोजी एकाच रात्री दोन घरात घरफोडी होऊन रोकड आणि मौल्यवान वस्तू चोरट्याने पळवल्या त्यामुळे रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या प्रकरणी ना म जोशी मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा करून गेले. सदर चोरटे हे याच परिसरातील असावेत असा संशय असून त्यांनी दिवसा या घरांची रेकी करून रात्री घरफोडी केली असावी . त्यामुळे या चाळीतील रहिवाशांना आता सावध राहायला सांगण्यात आले आहे तर हे चोरटे लवकरच पकडले जातील असा विश्‍वास पोलिसांनी व्यक्त केलाय. पक्षच्या नेत्यांनी भेट देवून दिलासा दिला तर पालिकेने लावलेले चाळीतील बंद पडलेले सी.सी.टीव्ही कॅमेरे चालू कधी होणार ?असा सवाल रहिवाशांचा आहे.

error: Content is protected !!