बेटिंग ऍप प्रकरणी अनेक बेड सेलिब्रिटी ईडीच्या जाळ्यात
नवी दिल्ली/ऑनलाइन बेटिंग ॲप १xबेट च्या जाहिरातीच्या संदर्भात अंमलबजावणी संचालनालय लवकरच मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत काही खेळाडू आणि अभिनेत्यांच्या कोट्यवधी रुपयांच्या मालमत्ता जप्त करणार आहे, काही सेलिब्रिटींनी १x betॲपद्वारे मिळवलेल्या जाहिरातींच्या पैशाचा वापर विविध मालमत्ता खरेदी करण्यासाठी केला आहे. हे गुन्ह्यांचे उत्पन्न मानले गेले आहे.
सेलिब्रिटींच्या या जंगम आणि स्थावर मालमत्ता जप्त करण्याचे आदेश ईडी लवकरच जारी करणार आहे. काही सेलिब्रिटींच्या संयुक्त अरब अमिराती (यूएई) सारख्या देशांमध्येही मालमत्ता आहेत. या मालमत्तांचे सध्या मूल्यांकन केले जात आहे.
गेल्या काही आठवड्यांपासून, ईडीने १xबेट ॲप प्रकरणासंदर्भात क्रिकेटपटू युवराज सिंग, सुरेश रैना, रॉबिन उथप्पा आणि शिखर धवन यांच्यासह अभिनेता सोनू सूद, अभिनेत्री मिमी चक्रवर्ती (माजी टीएमसी खासदार) आणि अंकुश हाजरा (बंगाली चित्रपट) यांची चौकशी केली आहे. काही ऑनलाइन इंफ्लूएन्सरची प्रभावकांचीही चौकशी करण्यात आली आहे.ईडीने मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याच्या (पीएमएलए) कलम ५० अंतर्गत खेळाडू, अभिनेते आणि प्रभावशाली व्यक्तींचे जबाब नोंदवले. अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्या बँक खात्यांचे आणि व्यवहारांचे तपशीलही दिले, ज्यात त्यांनी जाहिरात शुल्क कसे मिळवले हे उघड झाले. इतर अनेक खेळाडू आणि अभिनेते अजूनही चौकशीसाठी प्रलंबित आहेत. अभिनेत्री उर्वशी रौतेला (१एक्सबेटची भारत राजदूत) यांनाही समन्स बजावण्यात आले होते, परंतु त्या त्यावेळी परदेशात असल्याने हजर राहिल्या नाहीत.
