ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

निवडणूक महायुतीत लढवणार पण…..मुख्यमंत्र्यांचे संकेत

वर्धा/ आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत भाजपत दोन मतप्रवाह दिसत आहेत.काही भाजपा नेते या निवडणुका स्वबळावर लढवाव्यात यासाठी प्रयत्नशील आहेत.तर मुख्यमंत्र्यांनी मात्र या निवडणुका महायुती म्हणूनच लढवल्या जातील. त्यामुळे मित्रपक्षांवर टीका करू नका असा आदेश वर्धा येथील मेळाव्यात भाजपा कार्यकर्त्यांना दिला आहे.
राज्यात पुढील काही महिन्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ शकतात. सध्याची राजकीय परिस्थिती पाहाता या निवडणुकांबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. या निवडणुकांवर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. आम्ही या निवडणुका महायुती म्हणूनच लढणार असल्याचं त्यांनी म्हटलं, ते वर्धा येथे बोलत होते.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या महायुतीतत लढण्याचा आमचा प्रयत्न आहे. जिथे शक्य आहे तिथे महायुतीत लढू, जिथे शक्य नाही तिथे मैत्रीपूर्ण लढू. मैत्रीपूर्ण लढत हा नियम नाही, महायुती हा नियम आहे. मैत्रीपूर्ण लढत हा फक्त अपवाद असू शकतो, काही ठिकाणी तो होईल, काही ठिकाणी होणार नाही, असं फडणवीस यांनी यावेळी म्हटलं आहे.दरम्यान पुन्हा एकदा मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या युतीच्या चर्चेला उधाण आलं आहे, यावर देखील फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘कोण कोणासोबत युती करत आहे, हे गौण आहे. मुंबईच्या जनतेने महायुतीचा महापौर करण्याचे ठरवले आहे. त्यामुळे आम्हाला कोणासोबत लढायचे आहे, हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल, ते वेगळे लढले किंवा एकत्रित लढले, कसेही होऊ द्या तरीही महापौर महायुतीचाच होणार,’ असं यावेळी फडणवीस यांनी म्हटलं आहे. एकीकडे फडणवीस महायुती म्हणून निवडणुका लढण्यावर ठाम असतानाच भाजपतील काही नेत्यांनी मात्र या निवडणुका स्वबळावर लढवाव्यात कारण महायुती मधील मित्रपक्षांच्या काही आमदार आणि मंत्र्यांवर लोकांचा राग आहे अशावेळी महायुती म्हणून निवडणुका लढवल्या तर त्याचा भाजपला फटका बसू शकतो असे काही भाजपा नेत्यांचे म्हणणे आहे.नवे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हेसुद्धा स्वबळासाठी अनुकूल असल्याचे समजते.गेल्या महिन्यात अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावर आले होते तेव्हा त्यांनी स्वबळाची चाचपणी केली होती.या चाचपणी नंतर त्यांनीही स्वबळावर निवडणुका लढण्याबाबत अनुकूलता दाखवली होती. त्यामुळे भाजपा स्वबळावर लढणार की महायुती म्हणून लढणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महायुतीतील शिंदेंची शिवसेना आणि अजितदादांची राष्ट्रवादी यांच्यात तीव्र मतभेद आहेत.त्यातच या दोन्ही मित्र पक्षांच्या आमदार आणि काही मंत्र्यांच्या बेजबाबदार वर्तनामुळे महायुती सरकारवर टीकेची झोड उठवली जात आहे.कोकाटे, योगेश कदम,शिरसाट,गोगावले यांच्या एकापेक्षा एक कारनाम्यामुळे स्वतः शिंदे तर अस्वस्थ आहेतच पण मुख्यमंत्र्यांचीही प्रतिमा डागाळत चालली आहे.परिणामी विरोधकांकडून भाजपची कोंडी होत आहे.म्हणूनच भाजपच्या काही नेत्यांना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढवायच्या आहेत.

error: Content is protected !!