[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहापालिकामुंबई

कोविड सेंटर घोटाळ्यातील आरोपींवर अटकेची टांगती तलवार


मुंबई/कोविड काळात जे जम्बो कोविड सेंटर चालवण्यात आले होते त्यामध्ये फार मोठा घोटाळा झालेला असल्याने या घोटाळ्यात अडकलेल्या आरोपींची व्हिडिओ चौकशी होणार आहे त्यापैकी निकटवर्ती सुजित पाटकर युवा सेनेचे सचिव आणि निकट वरती सुरज चव्हाण यांच्या अटकेची शक्यता आहे सुरज चव्हाण यांची नुकतीच ईडीने साडेआठ तास चौकशी केली होती तसेच त्यांच्या घरावर यापूर्वी छापेही टाकण्यात आले होते या छाप्यात सुरज चव्हाण च्या चार बेनामी फ्लॅट ची माहिती पिढीला मिळाली आहे मात्र चौकशी यातील दोन फ्लॅट बेनामी असल्याचे सुरत चव्हाण यांनी कबूल केले आहे कोविड सेंटर घोटाळ्यात सुरत चव्हाण हा पालिका अधिकारी आणि कंत्रालदार यांच्यातील मध्यस्थी होता. ज्या लाईफ लाईन हॉस्पिटल ला कोविड काळात सुविधा पुरवण्याची कंत्राटी दिली होती त्यामध्ये मोठा घोटाळा झाला होता तीस कोटींची रक्कम मंजूर करण्यात आली होती पण त्यातले फक्त आठ कोटी रुपये खर्च झाले तर उर्वरित 22 कोटी रुपये कोणाच्या खिशात गेले याची आता चौकशी करीत आहे डॉक्टर पासून कोविडच्या औषधांपर्यंत सगळ्याच गोष्टी फक्त कागदावर दाखवणे परंतु प्रत्यक्षात या गोष्टी अस्तित्वातच नव्हत्या त्यामुळे कोविड सेंटर घोटाळ्यात सुरज चव्हाण आणि सुजित पाटकर यांच्यासह लाईफ लाईन हॉस्पिटलची संबंधित असलेले लोक बघते तिथले डॉक्टर असो की पालिका अधिकारी संजीव जयस्वाल असो या सगळ्यांवर आता अटकेची टांगती तलवार लटकत आहे या सर्वांना कधीही अटक होऊ शकते कारण हा घोटाळा फार मोठा असून त्याच्यामध्ये आणखी काही आरोपी असल्याची शक्यता वाटते

error: Content is protected !!