ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
गुन्हेमुंबई

अखेर शहारूखची मनंत पूर्ण- २५ दिवसांनी आर्यन खान सह तिघांना जामीन मंजूर


मुंबई/ ड्रग प्रकरणी अटकेत असलेल्या आर्यन खान अरबाज मर्चंट आणि मुनमुन यांना अखेर २५ दिवसांनी मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला . मात्र त्यांची सुटका शुक्रवार किंवा शनिवारी सर्व प्रोसिजेर पूर्ण झाल्यावर होणार आहे .मात्र जमीन झाल्याने आता खऱ्या अर्थाने मन्नत वर दिवाली साजरी होईल .
क्रुझ वरच्या रेव्ह पार्टी वर एन सी बी ने धाड टाकल्या पासून म्हणजे ३ ऑक्टोबरपासून आर्यन तुरुंगात आहे त्याच्या जामिनासाठी सतीश माने शिंदे यांच्या सारख्या वकिलांनी प्रयत्नांची शिकस्त केली . पण कनिष्ठ कोर्टाने आणि सत्र न्यायालयाने सुधा जमीन मंजूर केला नाही शेवटी उच्च न्यायालयात अपील करण्यात आले यावेळी सतीश माने शिंदे यांच्या जोडीला भारताचे माजी सॉलिसिटर जनरल मुकुल रोहितगी उभे राहिले आणि त्यांनी एन सी बी चां कारवाईची गेल्या तीन दिवसात चिरफाड करून ही अटक कशी बेकायदेशीर आहे . ही बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली .तसेच वॉट्स अप चाट हा पुरावा होऊ शकत नाही हे अनेक प्रकरणात हायकोर्टाने सांगितले आहे .हे सुधा हाय कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले आणि एन सी बी ने लावली. कलमे या केस मध्ये लागू होऊ शकत नाहीत त्यामुळे आर्यन खान याचा जमीन मंजूर करावा अशी मागणी केली . त्यानंतर न्यायालयाने अनिल सिंग यांच्याकडे वॉट्स अप चाट मागितली पण ती लिस्ट मोठी असल्याचे सांगून ते देऊ शकले नाही .त्यामुळे आर्यन खान अरबाज व मुन मुन यांचा जामीन मंजूर झाला . मात्र न्यायालयाच्या परवानगी शिवाय शहर देश सोडून जाता येणार नाही तसेच दर शुक्रवारी एन सी बी कार्यालयात हजेरी लावण्याची अट घालण्यात आली आहे .

error: Content is protected !!