ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्र

कल्याणच्या लसीकरण केंद्रावर दोन तरुणींमध्ये हाणामारी

कल्याण/ रेल्वे प्रवासासाठी दोन डोस ची सक्ती तसेच कोरोनची वाढती भीती यामुळे लसीकरण केंद्रावर मोठी गर्दी होत आहे आणि याच वाढत्या गर्दीमुळे काही लसीकरण केंद्रावर हाणामारीचे प्रकार घडत आहेत काल कल्याणच्या हॉली क्रॉस रुग्णालयातील लसीकरण केंद्रावर लस घेण्यासाठी रांगेत उभ्या असलेल्या दोन तरुणींमध्ये जोरदार हाणामारी झाली सुरवातीला बाचाबाची होऊन नंतर शिवीगाळ झाली आणि त्या नंतर या दोन्ही तरुण एकमेकींना भिडल्या आणि हाणामारी सुरू झाली यावेळी रांगेतल्या इतर लोकांनी तसेच लसीकरण केंद्रावरील महिला कर्मचाऱ्यांनी त्यांचे भांडण सोडवून त्यांना शांत केले कल्याण डोंबिवली मध्ये लसीचा तुटवडा असल्याने लोक लसीकरण केंद्रावर रात्री बारा वाजल्यापासूनच रांगा लावताना दिसतात अशावेळी जास्त गर्दी झाल्यावर भांडणे आणि हाणामारी सुरू होते त्यामुळे कल्याण डोंबिवली साठी लसीचा जादा साठा उपलब्ध करून देण्याची मागणी कल्याण डोंबिवली महापालिकेने केली आहे

error: Content is protected !!