[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामुंबई

राज्य सरकारचा मोठा निर्णय सरकारी आणि खाजगी कार्यालयात मास्क अनिवार्य

राज्य सरकारचा मोठा निर्णय
सरकारी आणि खाजगी कार्यालयात मास्क अनिवार्य

मुंबई/ करोना जरी काही प्रमाणात आटोक्यात आलेला असला तरी अजून तो गेलेला नाही त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून सरकारने सर्व शासकीय, निमशासकीय आणि खाजगी कार्यालयातील कर्मचाऱ्यांसाठी मास्क लावणे अनिवार्य केले आहे तसेच लसीचे दोन डोस घेणेही बंधनकारक केले आहे याबाबत सर्व विभागाच्या प्रमुखांना तशा सूचनाही देण्यात आल्या आहेत त्याच बरोबर सरकारी कामासाठी कार्यालयात येणाऱ्या अभ्यंगतांसाठी सुधा मास्क सक्तीचा आहे .शासकीय अथवा निमशासकीय तसेच खाजगी कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी लसीचे दोन डोस घेतले की नाही घेतले असतील तर तसे त्यांच्याकडे प्रमाणपत्र आहे की नाही याची कार्यालय प्रमुखांनी खातरजमा करून घेण्याचे आदर्श ही देण्यात आले आहेत

error: Content is protected !!