[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
गुन्हेताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

भारताला मुस्लिम राष्ट्र बनवण्याची योजना होती- पी एफ आय चां मास्टर प्लॅन चां पर्दाफाश

मुंबई/ जसा हिंदुत्ववाद्यांना भारताला हिंदू राष्ट्र बनवायचे स्वप्न होते तसेच पॉप्युलर फ्रंट या कट्टर पंथी मुस्लिम संघटनेला भारताला इस्लामी राष्ट्र बनवायचे स्वप्न होते आणि त्यासाठी त्यांनी मास्टर प्लॅन तयार केला होता अशी धक्कादायक माहिती उघडकीस आल्याने देशात मोठी खळबळ माजली आहे
काही दिवसांपूर्वी एन आय ए या राष्ट्रीय तपास यंत्रणेने देशातील 13 राज्यांमधील पी एफ आय चां कार्यालयांवर छापे टाकून जवळपास 200 कार्यकर्त्यांना अटक केली होती सध्या या कार्यकर्त्यांची कसून चौकशी सुरू आहे या चौकशीत भयानक खुलासे होत आहेत यात पीएफआय चे आर एस एस वर लक्ष होते आणि संघाचे कार्यकर्ते आणि संघाचे नागपूरच्या रेशीम बागेतील मुख्यालय त्यांच्या निशाण्यावर होते तसेच या देशाला त्यांना मुस्लिम राष्ट्र बनवायचे होते त्यासाठी हिंसक घटना घडवून देशात पीएफआय ची दहशत निर्माण करायची होती . त्याच बरोबर इथल्या मुस्लिम समाजाला तुमच्या नोकऱ्या जाणार आहेत तुम्हाला देशातून बाहेर काढले जाणार आहेत .तुमची संपती जप्त केली जाणार आहे .अशा प्रकारची खोटी माहिती देऊन त्यांना देशाविरुद्ध उठाव करायला लावण्याचा त्यांचा प्लॅन होता पण त्याचा आता पर्दाफाश झाल्याने तपास यंत्रणा पी एफ आय वर आणखी फास आवळून त्यांना कोण कोणाची मदत मिळते आहे याची माहिती घेऊन हे संपूर्ण उध्वस्त करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे समजते

error: Content is protected !!