ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगरा चेंगरी ६ ठार


हरिद्वार : उत्तराखंडमधील हरिद्वारमध्ये अतिशय दुःखद घटना घडली आहे. हरिद्वारमध्ये मोठी दुर्घटना घडली. हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात भाविकांची मोठी गर्दी झाली होती. मनसा देवी मंदिरात भाविकांच्या प्रचंड गर्दीमुळे चेंगराचेंगरी झाली आहे. या चेंगराचेंगरीत आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे. रविवारी, २७ जुलै २०२५ रोजी ही घटना घडली असून परिसरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रचंड गर्दीमुळे मंदिरात चेंगराचेंगरी झाली आणि यात ६लोकांचा जीव गेला. घडलेल्या घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. या घटनेची माहिती मिळताच प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केलं आहे. मंदिरातील बचावकार्यासाठी प्रशासनाकडून सर्वतोपरी मदत पुरवली जात आहे. चेंगराचेंगरीत जखमी झालेल्या लोकांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.मृतांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत जाहीर
मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरीत मृत्यू झालेल्या मृतांच्या कुटुंबीयांना प्रशासनाकडून आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. उत्तराखंड सरकारने या चेंगराचेंगरीच्या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. या दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी केली जाणार आहे.

error: Content is protected !!