ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्र

महाराष्ट्रात लॉक डाऊन ची शक्यता


मुंबई/ भारतात ओमिक्रोंच्या रुग्णांची संख्या आता साडेतीनशेचां पुढे गेलेली आहे .त्यामुळे केंद्र सरकारं देशात रात्रीचा लॉक डाऊन लावण्याचा विचार करीत असून मध्य प्रदेशात रात्रीचा लॉक डाऊन लावल्या नंतर आज पासून उत्तर प्रदेशातही रात्रीचा लॉक डाऊन लावण्याची घोषणा करण्यात आली आहे आणि त्यानंतर आता ओमीक्रोनचे सर्वाधिक ८८ रुग्ण सापडलेल्या महाराष्ट्रातही रात्रीचा लॉक डाऊन लावण्याच्या हालचालींना वेग आला आहे.
गुरुवारी महाराष्ट्रात ओमी क्रोन चे २३ रुग्ण आढळले होते त्यात मुंबईतील ५ रुग्णांचा समावेश आहे त्यामुळे काल राज्य मंत्रिमंडळाची तातडीची बैठक घेण्यात आली या बैठकीत ओमीक्रोनचां सध्याच्या स्थितीचा आढावा घेण्यात आला त्यानंतर काल मुख्यमंत्री ठाकरे यांनी टास्क फोर्सच्या डॉक्टरांशी चर्चा केली.दरम्यान गुरुवारी विधानसभेत उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी लॉक डाऊन चे संकेत दिले होते तसेच काल पंतप्रधान मोदी यांनी सुधा आपल्या वरिष्ठ मंत्री आणि अधिकाऱ्यांशी चर्चा केली या सगळ्या राजकीय घडामोडी पाहता पुन्हा एकदा देशात लॉक डाऊन लावण्याच्या हालचालींना वेग आला असल्याचे दिसत आहे.सुरवातीला रात्रीचा लॉक डाऊन आणि त्यानंतर २४ तासात लॉक डाऊन असे नव्या लॉक डाऊन चे स्वरूप असणार आहे.दरम्यान मध्य प्रदेश सरकारने गुरुवार पासून त्यांच्या राज्यात लॉक डाऊन लावल आहे तर उत्तर प्रदेशात शनिवार पासून रात्रीचा लॉक डाउन लावण्याची घोषणा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली आहे त्यामुळे आता ओमीक्रोनचे सर्वाधिक रुग्ण असलेल्या महाराष्ट्रात सुधा लवकरच रात्रीचा लॉक डाऊन लागण्याची शक्यता आहे.कदाचित २८ तारखेला हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर लॉक डाऊन लागू शकतो.

error: Content is protected !!