[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

डीलाईरोड मध्ये भुरट्या चोरांचा धुडगूस


मुंबई/गिरणी कामगारांचा मध्यमवर्गीय विभाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या, ना.म. जोशी मार्गावरील डीलाय रोड येथे सध्या भुरट्या चोरांनी धुडगूस घातलेला आहे. दिनांक 23/6/25 रोजी सकाळी 6.30  वाजता त्यांनी कारडोडी चाळ  खोलीमधील कपडे आणि रोकड लंपास केली. याप्रकरणी ना.म. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
     ना.म  जोशी मार्गावर  अज्ञात चोरांनी सकाळी चाळीतील खोलीमधील कपडे आणि  रोकड पळवली. याप्रकरणी ना.म. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवण्यात आली. सध्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद चंदनशिवे यांच्या मार्गदर्शना खाली उपनिरीक्षक शैलेश मोरे  या चोरीचा तपास करीत आहेत.   पंधरा दिवसापूर्वी डी टी एस कुरियर कार्यालयाचे दुकान फोडून चोरी करण्यात आली. त्या आरोपींचा शोध चालू आहे. मात्र या भागात अशा तऱ्हेने भुरट्या चोरांचा हैदोस सुरू झाल्यामुळे नागरिक संतापलेले आहेत.

error: Content is protected !!