[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय

राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर – माहिमच्या समुद्रातील अनधिकृत मजारीचे बांधकाम तोडले

मुंबई/ भाजपच्या मिळमिळीत हिंदुत्व पेक्षा ज्वलंत हिंदुत्व काय असते आणि जहाल हिंदुत्ववाद्यांचा एका इशाऱ्यावर. प्रशासनाची सुधा कशी फाटते हे राज ठाकरेंनी दाखवून दिले आहे. पाडव्याच्या शिवतीर्थावर झालेल्या मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी माहिमच्या समुद्रात अनधिकृत मजार बांधण्याचे काम कसे सुरू आहे याची माहिती दिली आणि हे अनधिकृत बांधकाम तोडले नाही तर तिथेच भव्य दिव्य गणपतीचे मंदिर बंधू असा इशारा देताच . राजकारणात मश्गूल असलेले मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची झोप उडाली आणि त्यांनी डाराडूर झोपलेल्या प्रशासनाला जागे करून तातडीने कारवाई करायला लावली. मोठ्या पोलीस बंदोबस्तात ते अनधिकृत बांधकाम तोडण्यात आले याला म्हणतात जहाल आणि आक्रमक हिंदुत्व! दरम्यान राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात नारायण राणे आणि इतर लोक शिवसेनेतून का फुटले आपण पक्षातून बाहेर पडण्यापूर्वी उध्दव ठाकरे यांनी कसे घाणेरडे राजकारण केले याची माहीत दिली .तसेच शिवसेनेचे धनुष्यबाण उद्धवला पेलवला नाही तो शिंदेंना तरी पेलवेल का असा सवाल करून शिंदेंनी उद्धवच्य सभे पाठोपाठ सभा घेत फिरण्यपेक्षा महराष्ट्रातील जनतेचे प्रश्न सोडवावेत असे आवाहन केले .त्याच बरोबर निवडणुका घेवून एकदाच काय तो महाराष्ट्रातील राजकीय अस्थिरतेचा प्रश्न सोडवावा असे ही सांगितले.

error: Content is protected !!