राजने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट! महायुतीत शिंदे एकाकी
मुंबई /सतत दिल्ली दरबारी धाव घेऊन आपले महत्व वाढवण्याचा खटाटोप करणाऱ्या उपमुखमंत्री शिंदे यांना, फडणवीसांनी जबरदस्त शह देत ठाकरे बंधुशी संपर्क वाढवलाय. त्यामुळे शिंदेंची राजकीय कोंडी झालीय.आज राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.तत्पूर्वी मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरें यांना फोन केला होता.तर दुसरीकडे सर्व जागा आम्हीच जिंकू . ठाणे जिल्ह्यातील सर्व शहरांमध्ये आमचाच महापौर असेल असे म्हणत भाजपचे ज्येष्ठ नेते गणेश नाईक यांनी शिंदेंच्या बालेकिल्ल्यातच त्यांच्यासमोर आव्हान उभेविले आहे.
एकनाथ शिंदे यांचा पक्ष जरी महायुतीत असला, तरी त्यांच्या मंत्री आणि आमदारांच्या बेताल वागण्याने मुख्यमंत्री फडणवीस कमालीचे नाराज झाले होते.मात्र फडणवीस शिंदेंच्या वादग्रस्त मंत्री आणि आमदारांवर कारवाई करणार हे दिसताच, शिंदे दिल्लीला जाऊन आपल्या मंत्री आणि आमदारांना वाचवण्याचा प्रयत्न करीत होते.परिणामी शिंदेंना सांभाळून घ्या असा भाजपा पक्षश्रेष्ठींकडून फडणवीसांना निरोप आला होता.त्यामुळे फडणवीस आणखी नाराज झाले.आणि याच नाराजीतून त्यांनी ठाकरे बंधूंशी संपर्क वाढवून शिंदेंची कोंडी करायला सुरुवात केली, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.बेस्ट पतपेढीतील पराभवाला ठाकरे बंधूंनी विशेष महत्व दिले नाही.आपण पार्किंगच्या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांना भेटलो असे राजने नंतर सांगितले.तर उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत एनडीए उमेदवाराला पाठिंबा देण्यासाठी फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना फोन केला होता असे सांगितले जात आहे. पण प्रत्यक्षात मात्र या भेटीगाठी एकनाथ शिंदेंची कोंडी करण्यासाठी सुरू असल्याचे बोलले जात आहे.त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाराष्ट्रात काहीतरी वेगळे पण धक्कादायक घडू शकते असा अंदाज वर्तवला जात आहे.महायुतीत शिंदे आणि भाजपा नेत्यांचे जसे पटत नाही तसेच अजित दादाच्या राष्ट्रवादीशी सुधा शिंदेंच्या नेत्यांचे परतावं समजते.नाशिकच्या पालकमंत्रिपदावर दावा सांगणाऱ्या भुजबळांना सुहास कांदे यांनी उघडपणे विरोध केला हे त्याचेच उदाहरण आहे.महायुतीत मित्र पक्षांकडून होत असलेल्या या कोंडीमुळेच शिंदे आणि त्यांचे सहकारी अस्वस्थ असल्याचे दिसत आह
नाशिक मध्ये कुंभमेळा होणार आहे.या कुंभमेळ्यासाठी जी विकास कामे हाती घेतली जाणार आहेत त्यावरून महायुतीत टेंडर वॉर सुरू झाल्याचे दिसत आहे.आणि त्यासाठीच राष्ट्रवादीचे नेते भुजबळ आणि भाजपाचे नेते गिरीश महाजन यांच्यातील नाशिकच्या पालकमंत्री पदाचा वाद शिगेला गेला आहे.तर रायगडमध्ये शिंदेंचे भरतशेठ पालकमंत्री पदासाठी असताना सावरून उभे आहेत.पण तटकरे त्यांना दाद देत नाहीत अशी एकंदरीत महायुतीची स्थिती आहे.
