ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

उपराष्ट्रपती धनकड यांचा राजीनामा!हरिभाऊ बागडे नवे उपराष्ट्रपती?


नवी दिल्ली/उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी काल (21 जुलै) आपल्या पदाचा राजीनामा दिला. प्रकृतीच्या कारणास्तव राजीनामा देत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राजीनामा देताना त्यांनी पंतप्रधानांसह सर्व मंत्रीमंडळाचे आभार मानले. त्यांच्या कार्यकाळाची मुदत ऑगस्ट 2028 पर्यंत होती. मात्र, कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच त्यांनी राजीनामा सादर केल्याने चर्चांना उधाण आले आहे. पदावर असतानाच प्रकृतीच्या किंवा इतर कारणामुळे राजीनामा देऊ करणारे देशाचे पहिले उपराष्ट्रपती, अशी नोंद झालेले राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू स्वीकारणार की नाही? हे लवकर स्पष्ट होणार आहे. तर धनखड यांचा राजीनामा राष्ट्रपतींनी स्वीकारला तर नवे उपराष्ट्रपती कोण होणार? याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहे. यात राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचे नाव आघाडीवर आहे.
उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी प्रकृतीच्या कारणास्तव आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी अचानक राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगल्या आहेत. संसदेच्या सर्व सदस्यांकडून मला मिळालेले प्रेम आणि विश्वास नेहमीच माझ्या आठवणीत राहील. देशाच्या महान लोकशाहीत उपराष्ट्रपती म्हणून मला अनेक अनुभव मिळाले यासाठी मी मनापासून आभारी आहे. देशाच्या आर्थिक प्रगतीचा आणि अभूतपूर्व विकासाचे साक्षीदार होणे आणि त्यात सहभागी असणे ही समाधानाची बाब आहे, असे धनखड यांनी म्हटले आहे. हे पद सोडताना भारताचा जागतिक पातळीवर झालेल्या उदयाचा आणि देशाच्या अभूतपूर्व कामगिरीचा मला अभिमान आहे. भारताचे भविष्य उज्ज्वल असेल, असा मला विश्वास आहे. मी मनापासून आदर आणि कृतज्ञता व्यक्त करतो, असे धनखड यांनी राष्ट्रपतींना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.
धनखड यांचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू स्वीकारणार की नाही? हे लवकरच स्पष्ट होणार आहे. धनखड यांचा राजीनामा स्वीकारला तर नवे उपराष्ट्रपती कोण होणार? याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहे. आता त्या परिस्थितीत महाराष्ट्र विधानसभेचे माजी अध्यक्ष आणि राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचे नाव सर्वाधिक आघाडीवर असल्याचे बोलले जात आहे. तर तमिळनाडूचे राज्यपाल रवी किंवा बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याही नावाचा या पदासाठी विचार केल्या जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आता धनखड यांचा राजीनामा राष्ट्रपतींनी स्वीकारला तर नवे उपराष्ट्रपती नेमके कोण होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

error: Content is protected !!