ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

ईव्हीएम शिवाय मोदी निवडणुका जिंकू शकत नाहीत- राहुल गांधी


मुंबई/उद्योगपतींची शक्ती हा देश चालवत आहेत .आणि मोदी हे केवळ एक मुखवटा आहे . त्यामुळे ईव्हीएम शिवाय मोदी निवडणूक जिंकू शकत नाहीत .कारण ईव्हीएम मध्ये अशा प्रकारचे कागद सेट केलेले आहेत की ते फक्त एकाच चिन्हाला मत जाते. असा गंभीर आरोप काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी शिवाजी पार्कच्या जाहीर सभेत बोलताना केला.
राहुल गांधींच्या भारत न्याय जोडो यात्रेची सांगता काल मुंबईच्या शिवाजी पार्क मध्ये जाहीर सभेने झाली .या सभेला इंडिया आघाडीतील सर्व मान्यवर नेते उपस्थित .होते ज्यामध्ये मेहबूबा मुफ्ती, स्टॅलिन, फारूक अब्दुल्ला, उद्धव ठाकरे, शरद पवार यासारख्या आघाडीतील सर्व दिग्गज नेत्यांचा समावेश होता. या सर्वांनी आपल्या भाषणात मोदींवर कडाडून हल्ला केला. मात्र राहुल गांधींचे भाषण अत्यंत लक्षणीय होते. राहुल गांधीनी सांगितले की मोदींवर आमचा वैयक्तिक राग नाही. कारण आम्हाला ठाऊक आहे मोदी हा एक मुखवटा आहे, पण देश चालवणारी एक मोठी शक्ती आहे. ती शक्ती म्हणजे उद्योगपतींची शक्ती. त्या उद्योगपतींची जी पॉलिसी असेल ती पॉलिसी केंद्राकडून ठरवली जाते. आणि त्यानुसारच देश चालतो. ते सांगतील तेच होते. उदाहरणार्थ एखादा विमानतळ बांधायचा असल्यास ,काही वर्षे लागतात. परंतु एका उद्योगपतीच्या मुलाच्या लग्नासाठी मुंबईत पंधरा दिवसात विमानतळ झाला. यातच सारे काही आले. म्हणूनच या देशातील महागाई, गरिबी, भ्रष्टाचार ,बेरोजगार यासारख्या प्रश्नाला बाजूला ठेवून नको ते प्रश्न नको ते मुद्दे भाजपकडून चर्चेला आणले जात आहेत .त्याचबरोबर इन्कम टॅक्स, इडी,सीबीआय यासारख्या तपास यंत्रणांचा दबाव टाकून लोकांना घाबरवले जात आहे. महाराष्ट्रातला एक बडा नेता नुकताच काँग्रेस काँग्रेस सोडून भाजपात गेला. पण तत्पूर्वी तो माझ्या आईला भेटून अक्षरशः रडला. आणि म्हणाला की मला खरोखरच लाज वाटते. पण माझा नाईलाज आहे. कारण जर भाजपात गेलो नाही तर माझ्यामागे तपास यंत्रणांचा ससेमीरा लागेल. तेव्हा अशी परिस्थिती संपूर्ण देशामध्ये आहे .विरोधी पक्षातील नेत्यांना वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये अडकवून घाबरवले जात आहेत. परंतु मी मात्र घाबरणार नाही. कारण मला माहिती आहे मोदी मला घाबरतात कारण सर्व काही मला माहिती आहे. त्यामुळे मी त्यांच्याविरुद्ध माझ्या या सर्व सहकाऱ्यांच्या मदतीने लढण्यास उभा आहे. त्यात मला तुमची साथ हवी आहे .तुम्ही निश्चितपणे सत्ता परिवर्तन घडवून आणू शकता .अशा शब्दात राहुल गांधी यांनी मोदींवर टीका केली तसेच या सभेच्या माध्यमातून महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीने मुंबईमध्ये जोरदार शक्तिप्रदर्शन केले.

error: Content is protected !!