ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

आमदाराला पालिकेच्या निधी वाटपा वरून राजकीय धमासान


मुंबई/सध्या पालिकेवर प्रशासक असल्याने विकास कामाला पुरेशी चालना मिळत नसल्याचे दिसत आहे त्यामुळेच पालकमंत्र्यांच्या शिफारशीवरून आमदारांना विकास निधी देण्याबाबत निर्णय झाला होता त्यानुसार मुंबईतील २१ आमदारांना ५७० कोटींचा विकास निधी वाटप करायचे होते यापैकी 16 आमदारांना मुंबई शहर चे पालकमंत्री दीपक केसरकर व उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या शिफारशीवरून विकास निधी दिला जाणार आहे परंतु पाच आमदारांना मात्र थेट मुख्यमंत्र्यांच्या शिफारशीवरून विकास निधीचे वाटप करण्यात आल्याने आता राजकीय वादाला तोंड फुटले आहे कारण विकास निधी वाटपाबाबतचा निर्णय पालक मंत्री घेत असतात असे असताना पाच आमदारांना विकास निधी देण्याचा परस्पर निर्णय मुख्यमंत्र्यांनी कसा घेतला असावा विचारला जात आहे मुख्यमंत्र्यांनी ज्या पाच आमदारांना विकास निधी दिला आहे त्यात दहिसरच्या मनीषा चौधरी कुरळ्याचे मंगेश कुडाळकर बाघा ठाण्याचे प्रकाश सुर्वे यांचा समावेश आहे

error: Content is protected !!