[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामनोरंजनमुंबई

दिशाला मृत्यू नंतरही बदनाम का करताय -आई वडिलांचा सवाल

मुंबई/ सुशांतसिंग राजपूत याची कथित सेक्रेटरी दिशा सलियान हिच्या आत्महत्येचे राजकारण सुरू झाल्यामुळे दिशाचे पालक प्रचड तनावा खाली असून आम्हाला शांतपणे जगुद्य अन्यथा जीवच बरे वाईट करू असा इशारा त्यांनी दिल्यामुळे आता दिशा सलीयान प्रकरणाला भावनात्मक कलाटणी मिळाली आहे.
सुशांतसिंग राजपूत यांच्या आत्महत्येनंतर दिशा सलियन हिनेही इमारतीवरून खाली उडी टाकून आत्महत्या केली होती. मात्र त्या अगोदर तिच्यावर बलात्कार झाला होता असे सांगितले जात होते दरम्यान जया पार्टी नंतर दिशेने आत्महत्या केली त्यावेळी शिवसेना मंत्री तेथे हजर होते असा आरोप केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला होता. त्यामुळे मोठी खळबळ माजली होती दरम्यान सध्या सुशांतसिंग राजपूत प्रकरणाची चौकशी सुरू आहे .मधल्या काळात यावरची चर्चा थांबली होती. मात्र सोमय्या यांनी शिवसेना विरुढची आरोपांची मालिका तेज केल्याने आणि त्यानंतर संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन सोमय्या आणि भाजपवरील गंभीर आरोप केल्याने राणे यांनी पुन्हा दिशा सालियान प्रकरण उकरून काढले अशी शिवसेनेवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला त्यामुळे शिवसेनेकडून मृत्यू नंतरही देशाची बदनामी केली जात असल्याची तक्रार महिला आयोगाकडे करण्यात आली होती. आणि या तक्रारीची 48 तासात चौकशी करण्याचे आदेश महिला आयोगाने दिले आहेत .या सगळ्या प्रकारामुळे दिशाचे आई वडील अत्यंत नाराज असल्याने काल महापौर किशोरी पेडणेकर आणि महिला आयोगाच्या दोन सदस्यांनी दिशाच्या आई वडिलांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. त्यानंतर दिशाच्या आई वडिलांनी आता तरी दिशाची बदनामी थांबवावी. तीच्यावर बलात्कार झाला नव्हता आणि ती सुशंतची सेक्रेटरी सुधा नव्हती असा खुलासा करून हे राजकारण थांबवले नाही तर आम्ही जीवाचे बर वाईट करू असा इशारा दिलाय.

error: Content is protected !!