ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

सूर्यकांत फातर्फेकर यांच्या निधनाने उत्साहाचा धबधबा आटला : नरेंद्र वि. वाबळे

मुंबई, शुक्रवार : मुंबई मराठी पत्रकार संघाचे सन्माननीय सदस्य व ज्येष्ठ क्रीडा पत्रकार श्री. सूर्यकांत फातर्फेकर यांच्या निधनाने पत्रकारितेतील आणि सामाजिक कार्यातील उत्साहाने वाहणारा धबधबा आटला आहे, अशा शब्दांत मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री. नरेंद्र वि. वाबळे यांनी आज आपला शोक व्यक्त केला.

आपल्या शोकसंदेशात श्री. वाबळे पुढे म्हणतात की, श्री. सूर्यकांत फातर्फेकर म्हणजे सदैव हसतमुख व्यक्तीमत्व होते. पत्रकारितेत आणि सामाजिक कार्यात श्री.फातर्फेकर म्हणजे उत्साहाचा धबधबा होते. मुंबई मराठी पत्रकार संघाच्या कार्यात ते अखेरपर्यंत सक्रीय होते. विशेषत: पत्रकार संघाचे लोणावळा येथील
कै. दी. गो. तेंडुलकर स्मृति मंदिर हा फातर्फेकर यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय होता. स्मृतिमंदिराचे जतन व तेथील निसर्ग संपत्तीचे संवर्धन यासाठी ते कायम झटत राहिले. चांगले काम करणाऱ्या पत्रकारांचे आणि सामाजिक संस्थांचे ते आवर्जून कौतुक करीत. ते स्वभावाने परखड होते पण तितकेच मृदू होते. त्यांच्या निधनाने मुंबई मराठी पत्रकार संघाची आणि वैयिक्तक माझी न भरून येणारी हानी झाली आहे. कै. सूर्यकांत फातर्फेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली!

error: Content is protected !!