ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहापालिकामुंबई

पालिका निवडणुकीच्या तोंडावर सेना -भाजपा मध्ये आरोप प्रत्यारोपांचा सामना सुरू-१०० कोटींचा घोटाळा

मुंबई/ पालिका निवडणूक जसजशी जवळ येत चालली आहे तसतसे सेना भाजपतील आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत.एकीकडे भाजपकडून किरीट सोमय्या यांच्या माध्यमातून सेनेवर नव्या नव्या घोटाळ्यांचे आरोप होत आहेत तर सेनाही भाजपा वर आरोपांच्या फैरी झडत आहेत खास करून सेनेचे पालिकेतील घोटाळे उघडकीस आणीत आहे .आता चर बुजवण्याचे निविदा प्रकरणात १०० कोटींचा घोटाळा झाला असल्याचा आरोप भाजपा नेतेे मिहीर कोठे आणि विनोद मिश्रा यांनी केला असून चौकशीची मागणी केली आहेे. त्यावेळीी गटनेते प्रभाकर शिंदे आधी भाजप नगरसेवक उपस्थित होतेे
२६ ऑगस्टला चर चां कामाची निविदा काढण्यात आली. पाच कंत्राटदारांनी ३८० कोटींची बोलू लावली पण अवघ्या तीन महिन्यातच म्हणजे नोव्हेंबरला याच कामासाठी ५६९ कोटींची निविदा प्रसिद्ध झाली यात सत्ताधारी सेनेने मोठा झोल केला असल्याचा संशय व्यक्त करून या संपूर्ण प्रकरणाची पालिका आयुक्तांनी चौकशी करण्याची मागणी भाजपने केली आहे .तर ही मुंबईकरांच्या पैशाची लूट असल्याने या कामाचे लाभार्थी ठरणाऱ्या सर्व कंत्राटदारांना काळे यादीत टाकून त्यांची चौकशी करावी करावी आणि दोषी आढळल्यास त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करावेत अशी मागणी मुंबईकरांनी केली आहेे

चर निवेदेमध्ये डांबर प्लांट धारकांनाच अथवा त्यांचा परवाना असणाऱ्या भाग घेणार येत असल्याची अट टाकून हा गेम वाजवण्यात आला. त्यामुळे ज्यांच्याकडे डांबर प्लांट नाहीत अथवा परवाना पाहिजे अशा कंत्राटदारांचे वांदे झाले. याचा फायदा डांबर प्लांट कंपन्यांना झाला. त्यांनीच स्वतः निवेदित भाग घेऊन इतरांना इंगा दाखवला.

विशेष बाब म्हणजे मागील चर निविदा ३५ टक्के कमी दराने निघाली तर आत्ताची निविदांमध्ये फक्त ५ टक्के कमी दराने निवेदन देण्यात आला. यात पालिकेचा तोटा होणार असून कंत्राटदार मालामाल होणार आहेत. यामध्ये त्यांना डांबर प्लांट देण्यात आली त्यांचे कागदपत्र पालिकेने तपासून त्याचे खरोखर प्लांट वरती डांबर निर्मिती होते का याची चौकशी होणे गरजेचे आहे.

कंत्राट लागलेल्या कंपनी

झोन 1. ज्ञान कंट्रक्शन कंपनी

झोन 2 महावीर कंट्रक्शन कंपनी

झोन ४ आर जी शहा इन्फ्रातेच प्रायव्हेट लिमिटेड

झोन ३ प्रीती कन्ट्रक्शन

झोन ५ लँडमार्क पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड

झोन ६ आर अँड बी प्रायव्हेट लिमिटेड

झोन ७ एपीआय सिव्हिल कोन प्रायव्हेट लिमिटेड

error: Content is protected !!