[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

ब्रेकिंग! अजितदादांनी घेतला थेट मुख्यमंत्र्यांशी पंगा


राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यातील एका रुग्णालयात 24 रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी शिंदे यांना, तुमच्या ठाण्यात एवढे मृत्यू कसे? असा थेट सवाल केला आहे. अलीकडे मंत्र्यांची एक खासगी बैठक पार पडली. यावेळी सर्वच मंत्री उपस्थित होते. विविध प्रश्न, योजना आणि निर्णयावर चर्चा सुरू होती. त्याचवेळी ठाण्यातील कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील मृत्यूंचा मुद्दा अजितदादा यांनी उपस्थित केला. तुमच्या ठाण्यात एवढे मृत्यू कसे? असा सवाल अजितदादा यांनी थेट मुख्यमंत्री शिंदे यांनाच विचारला. घटना गंभीर आहे. काळजी घेतली पाहिजे, असेही अजितदादा यांनी शिंदे यांना सुनावले. यानंतर वादाची ठिणगी पडल्याचे दिसताच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हस्तक्षेप केल्यानंतर हा विषय थांबला”

error: Content is protected !!