ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
मुंबईराजकीय

एकनाथ शिंदे यांना नारायण राणेंची ऑफर


मुंबई/ एकनाथ शिंदे हे शिवसेनेत कंटाळले असून तसे असेल तर त्यांनी भाजप मध्ये यावे इथे त्यांचा योग्य तो मान राखला जाईल अशी ऑफर केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी एकनाथ शिंदे यांना दिली आहे
नारायण राणे हे जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने सध्या मुंबई आणि कोकण दौर्‍यावर आहेत. नाला सोपारा येथे प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की एकनाथ शिंदे शिवसेनेत नाराज आहेत कारण प्रत्येक फाईल मातोश्रीच्या आदेशा शिवाय हलत नाही त्यामुळे शिंदे वैतागले असून त्यांना आपण फोन करणार आहोत ते जर भाजप मध्ये आले तर ते त्यांच्या राजकीय भवितव्याच्या दृष्टीने फायदेशीर ठरेल असेही ते म्हणाले

error: Content is protected !!