ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहापालिकामुंबई

उर्दु भाषा भवन सेनेच्या उपक्रमावर भाजपचा प्रहार- मुद्दा विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर विधान परिषदेत उचलणार


मुंबई- शिवसेनेला हिंदुत्वाच्या बरोबर आता मराठीचा सुधा विसर पडलेला असून मुंबई सेंटॄल, अग्रिपाडा येथे पालिकेच्या प्रयत्नातून उर्दू भाषा भवन उभारले जात असून त्याला भाजपने तीव्र विरोध केलाय मंगळवारी (दिं-18 जानेवारी)रोजी विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी या जागेला भेट देऊन सविस्तर माहिती घेतली तसेच जर हे उर्दू भाषा भवन झाले तर् आम्ही तीव्र आंदोलन करू असा इशारा भाजपने दिला आहे. मुंबईतील मराठी माणसाच्या मतांवर निवडून आलेल्या शिवसेनेला कधी मुंबईत मराठी भाषेसाठी मोठे उपक्रम राबवण्याची सुबुद्धी झाली नाही पण ऐन पालिका निवडणुकीच्या तोंडावर मराठी मतांचा टक्का घसरण्याची भीती जाणवू लागल्याने अग्रिपाड्यातील एका समाजातील जनतेला खुश करण्यासाठी उर्दू भाषा भवन बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेचा हा मराठी द्रोही मनसुबा आम्ही उधळून लावल्याशिवाय राहणार नाही असा इशारा भाजपचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी दिला .मात्र आता प्रवीण दरेकर यांनी या संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतलेली असून या कारस्थनाचा ते पर्दाफाश करणार आहेत.हा मुद्दा विधान परिषदेत उचलणार असल्याची माहीती पत्रकारांना दिली.
ही जागा उर्दू भवण केन्द्राला देण्या अगोदर जागा शैक्षणिक संस्थेसाठी आरक्षित होती .तंत्र शिक्षण प्रशिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांसाठी येथे निवासस्थाने होणार होते. तसा फलकही तेथे होता पण अचानक तो गायब झाला.उर्दू भाषेला आमचा विरोध नाही पण उर्दू भाषेच्या नावाखाली जर उद्या इथे काही कारस्थाने शिजली तर त्याची जबाबदारी पालिका घेणार आहे का? असा सवाल भाजपने केला.
तिथे उर्दू भाषा केंद्र उभे राहत आहे आणि तेही स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव आणि त्यांच्या लोकप्रिय हिंदू प्रिय आमदार पत्नी यामिनी जाधव यांच्या प्रयत्नातून मताच्या तॄष्टीकरण यासाठी परवाना दिली का ? असा सवाल भाजपचे मुंबई प्रदेश अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांनी केला
दरेकराच्या सवालावर गडबडले पालिका अधिकारी
विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांचा प्रत्यक्ष जागेवर भेट दिली असता पालिकेकडून ई प्रभागाचे सहायक अभिंयता अभय जगताप उपस्थित होते .त्यांच्याकडे उर्दू भाषा भवनाचा ठराव प्रत मागितली असता ठराव शोधण्यात त्याचा वेळ गेला. त्यावेळी पालिका अधिकार्‍यांना भवणा संबधित कागदपते पाठविण्याचे आदेश दिले तर अग्रिपाडा पोलिस वरिष्ठाना कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही यांची काळजी घेण्याचा सल्ला दिला.

भाजपचा आंदोलनाचा इशारा
शिवसेना कडून आग्रीपाडा येथे जे उर्दू भाषा केंद्र उभारले जाणार आहे त्याला भाजपचे मुंबई प्रदेश अध्यक्ष मंगलप्रभात लोढा ,म्हाडाचे अध्यक्ष मधु चव्हाण,भायखळा विधानसभा अध्यक्ष नितीन बनकर, ओबीसी सेलचे सचिव रोहिदास लोखंडे, युवा अध्यक्ष प्रथमेश कानडे यांनी विरोध करताना तिथे उर्दू भाषा केंद्ररच का? ती जागा शैक्षणिक संस्थेसाठी आरक्षित होती आणि तंत्र शिक्षण प्रशिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांसाठी येथे निवासस्थाने आरक्षित असताना ते बदलण्याची षड्यंत्र कोणी केले ? हे जनतेसमोर यायला हवे. या विरोधात सवाल करीत आंदोलनाचा इशारा दिला आहे.

error: Content is protected !!