ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
मुंबई

आता सहकार क्षेत्रातील घोटाळे बाजांची खैर नाही-

मुंबई/महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाचा आर्थिक कणा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सहकार क्षेत्रातील भ्रष्टाचाराचे समूळ उच्चाटन करण्यासाठी केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी काल एक बैठक बोलावली होती या बैठकीच्या माध्यमातून अमित शहा यांनी महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रात झालेल्या भ्रष्टाचाराची माहिती घ्यायला सर्वात केल्याने आता सहकार क्षेत्रातील लुटारूंनी खैर नाही असे मुंबईचे माजी उप महापौर आणि भाजप नेते बाबूभाई भवानंजी यांनी सांगितले
बाबूभाई पुढे म्हणाले महाराष्ट्रात सहकाराच्या माध्यमातून ग्रामीण जनतेचा विकास व्हावा म्हणून स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी सहकाराचा पाया घातला त्यामुळे महाराष्ट्रात सहकारी पत पेढ्या,सहकारी बँका,सहकारी सूत गिरण्या साखर कारखाने उभे राहिले मात्र या सर्व सहकारी संस्थांच्या संचालक मंडलात लुटारूंनी प्रवेश केल्याने सहकार क्षेत्र बुडीत निघाले सहकारी बँकांमधील शेतकऱ्यांचे पैसे बुडून बँकाची आणि त्यातील खातेदारांची वात लागली सूतगिरण्या आणि साखर कारखाने तोट्यात दाखवून ते कमी पैशात विकायला सर्वात झालीय त्यामुळे ग्रामीण भागातील गरीब शेतकरी आणि कष्टकरी जनतेचे मोठे नुकसान झाले आहे म्हणूनच बहजपने हे सर्व झोल झपटे बंद
करण्यासाठी केंद्रात सहकार खाते तयार करून याचा कारभार अमित शहा यांच्याकडे दिलाय अमित शहा यांनी त्यासाठीच काल एक बैठक घेऊन सहकार क्षेत्रातील नेते आणि अधिकाऱ्यांची बैठक घेऊन चर्चा केली त्यामुळे आता सहकार क्षेत्रातील घोटाळेबाजांना खाई नाही असे बाबूभाई यांनी म्हटले आहे

error: Content is protected !!