[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

जयंत पाटलांच्या आईविषयी अपशब्द वापरणाऱ्या गोपीचंद पडळकर विरुद्ध संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन

मुंबई/सुसंस्कृत महाराष्ट्राला मान खाली घालायला लावेल असे संतापजनक विधान भाजपचे मुजोर आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले आहे.”जयंत पाटला तुझ्यासारखी भिकारी अवलाद नाही. तू राजाराम पाटलाने काढलेली औलाद वाटतं नाही, काहीतरी गडबड आहे’, अशा शेलक्या भाषेत त्यांनी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटलांवर टीका केली .त्यांच्या या टीकेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली असून पडळकर यांच्या विरोधात शरद पवार गटाने रस्त्यावर उतरून आंदोलन केले.
पडळकर यांच्या वक्तव्यानंतर
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी आक्रमक झाले आहेत. इस्लामपूर आणि परिसरात पडळकर यांच्याविरोधात मोर्चे निघत काढण्यात आले. दस्तुरखुद्द पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करून पडळकर यांच्याबद्दल तक्रार केली. उपमुख्यमंत्री अजित पवारही यांनीही पडळकरांचा समाचार घेतला.पाटील स्वतः बोलले तर ही लढाई ते विरुद्ध पडळकर इतकीच होईल, पण गप्प बसून त्यांनी भाजपच्याच लोकांना बोलणं भाग पाडले. पवारांनी मुख्यमंत्री फडणवीसांना फोन करणं, पडळकरांना फडणवीसांनी दिलेली समज, भाजपच्या सगळ्या प्रवक्त्यांनी मान्य केलेली चूक हे एकप्रकारे जयंत पाटलांच्या पथ्यावरच पडणारे आहे. शिवाय राज्यभर त्यांच्या पक्षाचे नेते कार्यकर्तेही बोलत आहेतच. म्हणजे त्यांनी साप तर मारलाय पण पाहुण्याच्या काठीने.
राजकारण हा जितका दाखवण्याचा खेळ आहे त्याहून जास्त आकड्यांचा खेळ आहे. आत्ताच्या घडीला सांगलीवर एकहाती सत्ता असणारे जयंत पाटील जरा मागे पडलेत. यावेळी कधी नव्हे पाटलांचे मताधिक्य लक्षणीय कमी झालं आहे. त्यांच्या वैयक्तिक संस्था सोडल्या तर बाकी ठिकाणी तितकी ताकद राहिलेली नाही.
तरुण नेत्यांना ताकद देऊन भाजपने जयंत पाटील यांना चहूबाजूंनी घेरलं आहे. याला अजितदादांचीही ताकद मिळाली आहे. आता पडळकरांना फार अंगावर घेऊन उगीच ताकद वाढवण्याच्या फंदात ते पडत नाही. अर्थात म्हणून ते हातावर हात ठेवून बसलेत असाही अर्थ नाही. पण कमी झालेल्या ताकदीचा अंदाज त्यांच्यासारख्या कसलेल्या राजकारण्याला अर्थातच आहे.
दरम्यान गोपीचंद पडळकर यांच्या अशा बेताल वागण्यामुळे भाजपची बदनामी होत आहे.त्यामुळे एकतर त्यांना शेवटची समाज द्यावी, किंवा पक्षातून त्यांची हकालपट्टी करावी अशी मागणी भाजप मधील काही निष्ठावंताची केली असल्याचे समजते.पडळकर यांच्या कार्यकर्त्यांनी मागील अधिवेशन काळात विधानभवनाच्या परिसरात राडेबाजी केली होती तेंव्हा केवळ विरोधी पक्षच नव्हे तर महायुतीतील नेतेही संतापले होते परिणामी पडळकरांवर माफी मागण्याची पाली आली होती.पण त्यानंतरही त्यांच्यात सुधारणा झाली नाही.आता तर त्यांनी जयंत पाटील यांच्या सारख्या ज्येष्ठ नेत्याच्या आई बद्दल अपशब्द वापरून संपूर्ण महाराष्ट्राचा रोष ओढवून घेतला आहे.सत्ताधारी भाजपासह सर्वच पक्षाच्या नेत्यांनी पाडळकरांवर कठोर शब्दात टीका करून त्यांना लगाम घाला अशी मागणी केली आहे.

जयंत पाटील यांच्या आई वडिलांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या गोपीचं पडळकर यांच्यावर भाजपतील अनेक नेते नाराज झाले आहेत.त्यांची जी काही वर्तणूक सुरू आहे ती भाजपची संस्कृती नाही त्यामुळे पक्षनेतृत्वाने त्यांना योग्य समाज द्यावी असे काही भाजपा नेत्यांनी म्हटले असल्याचे समजते.तर भविष्यात अशी विधाने करू नका अशा भाषेत मुख्यमंत्र्यांनी सुधा पडळकर यांना कडक शब्दात समज दिली आहे.

error: Content is protected !!