ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
महाराष्ट्र

मनसे कार्यकर्त्यानी अखेर भिवंडी मालोडी टोलवसुली बंद न करणारा टोलनाका फोडला…

भिवंडी दि 20(आकाश गायकवाड )तालुक्यातील अंजुरफाटा खारबाव कामण चिंचोटी फाटा या दरम्यानच्या राज्यमार्गाची खड्डयांमुळे दुरावस्था झाली असून या विरोधात स्थानिकांसह विविध राजकीय पक्षांबकडून आंदोलने निवेदन देऊन ही या रस्त्याची दुरुस्ती होत नसल्याने नागरीक संतप्त असून त्यातून शुक्रवारी या रस्त्यावर चाल करून आलेल्या मनसे सैनिकांनी अखेर टोलवसुली बंद न ठेवणाऱ्या टोल नाक्यावर हल्ला करीत तोडफोड केली आहे .

या रस्त्यावरील खड्ड्यांची दुरुस्ती करावी ती जो पर्यंत होत नाही तोपर्यंत रस्त्यावरील टोल वसुली बंद ठेवावी अशी मागणी मनसे चे ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी केली होती .त्यानुसार गुरुवारी या टोलनाक्यावर अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करून टोल वसुली बंद केली होती.परंतु आंदोलकांची पाठ फिरल्या नंतर पुन्हा टोल वसुली सुरू केल्याने याची कुणकुण मनसे सैनिकांना लागताच शुक्रवारी दुपारी बारा वाजताच्या सुमारास या ठिकाणी आलेल्या मनसे कार्यकर्त्यानी हातातील लाकडी दांडक्याने टोल वसूल करणाऱ्या कॅबिनीं ची तोडफोड करून पोबारा केला आहे .या घटनेने खळबळ उडाली असून तालुका पोलीस घटनास्थळी दाखल होऊन तोडफोड करणाऱ्या कार्यकर्त्यांची माहिती घेऊन त्या विरोधात गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया करीत आहेत

error: Content is protected !!