[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्याराजकीय

किरीट सोमय्या यांच्या गाडीवर शिवसैनिकांचा हल्ला


वाशीम/ भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या गाडीवर काल वाशिम मध्ये शिवसैनिकांनी दगडफेक केली सुदैवाने यात सोमय्या यांना कोणत्याही प्रकारची इजा झालेली नाही मात्र या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दखल केला आहे
शिवसेनेच्या वाशिम च्या खासदार भावना गवळी यांनी बालाजी पार्टिकलl बोर्ड या कारखान्याच्या माध्यमातून १०० कोटींचा घोटाळा केला असून या प्रकरणी त्यांची चौकशी करावी अशी मागणी सोमय्या यांनी केलेली होती त्यामुळे शिवसिनिकांचा त्यांच्यावर राग होता काल दुपारी त्यांच्या गाडीचा ताफा वाशिम शहरातून जात असताना शिवसानिकानी त्यांच्या गाडीवर दगडफेक आणि शाई फेक केली मात्र पोलिसांनी शिवसैनिकांना पांगवल्याने पुढील अनर्थ टाळला यावेळी सोमय्या यांच्या सोबत भाजपचे आमदार सुधा होते

error: Content is protected !!