ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

महायुतीला मनसेचे इंजिन


सत्तेच्या राजकारणात नैतिकता, विचारधारा, धोरण याना काहीही किंमत नसते. त्यामुळे कोण कोणाचा कायमचा मित्र, अथवा कायमचा शत्रू नसतो .कारण सत्तेच राजकारण हे बेरजेचं असतं. त्यामुळे कधी कधी आपली ध्येय धोरणे बाजूला ठेवून, युत्या आघाड्या कराव्या लागतात. सध्या महायुती असो ,किंवा महाविकास आघाडी, या दोन्हींमध्ये वेगवेगळ्या विचारधारांचे लोक एकत्र आलेले आहेत .आणि ही त्यांची मजबुरी आहे. कारण कुठल्याही एका पक्षाला स्वबळावर सत्ता मिळणे अवघड असते. म्हणून अशा तकलादू यूत्या ,आघाड्या कराव्या लागतात. महाराष्ट्राच्या राजकारणात मनसे बाबत काँग्रेस आणि भाजपा दोघांचेही धोरण जवळपास सारखेच होते. त्यामुळे या दोन्ही पक्षांनी मनसेला जवळ येऊ दिले नाही. उलट मनसेच्या परप्रांतीय विरोधी भूमी केला सातत्याने विरोध केला. पण आत्ता लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर, भाजपवाल्यांना मनसेची आवश्यकता भासू लागली. याचे मुख्य कारण शिवसेनेतून फुटलेले एकनाथ शिंदे, आणि राष्ट्रवादीतून फुटलेले अजित पवार हे जरी आज सत्तेत भाजपासोबत असले ,तरी या दोघांवरही भाजपचा विश्वास नाही. शिवाय मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिंदे गट, असो किंवा अजित पवार गट असो, या दोघांचाही काही उपयोग होणार नाही .कारण मुंबईत या दोघांची अजिबात ताकत नाही. या उलट मुंबईत मनसे आणि शिवसेना याची समसमान ताकद आहे. आणि म्हणूनच भाजपाने यावेळी मनसेला साथ घातली आहे .गेल्या चार दिवसात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे दोन वेळा दिल्लीला जाऊन आले. दुसऱ्या वेळेस त्यांची अमित शहा आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासोबत चर्चा झाल्याचे समजते. मनसे जर महायुतीत आली तर त्यांचा भाजपला किती फायदा होईल ,आणि किती तोटा होईल हे या निवडणुकीत कळू शकेल. पण अजित दादा आणि शिंदेंवर भरोसा नसलेल्या भाजपवाल्याना, आज राज ठाकरे निश्चितपणे जवळचे वाटत आहेत. म्हणूनच त्यांना महायुतीत आणण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत .दरम्यान महायुतीत जाण्याबाबत राज ठाकरेंची नेमकी भूमिका काय हे अजून पर्यंत जरी स्पष्ट झालेले नसले, तरी भाजपा ने त्यांच्या विधानांवरून राज ठाकरे महायुतीत जाणार हे जवळपास नक्की आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भलेही महायुतीत राज ठाकरेंच्या वाट्याला पुरेशा जागा आल्या नाहीत .तरी लोकसभा निवडणुकीच्या बदल्यात ,त्यांना विधानसभा आणि महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये भाजपची मदत हवी आहे. खास करून भाजपलाही मुंबई महानगरपालिका जिंकण्यासाठी मनसेची मदत लागणार आहे. या सर्व राजकीय पार्श्वभूमीवर राज ठाकरेंची महायुतीतील एन्ट्री महाराष्ट्राच्या राजकारणाला निश्चितपणे कलाटणी देणारी ठरू शकेल. याचे कारण मनसेचे महाराष्ट्रातील काही शहरांमध्ये चांगली संघटनात्मक ताकद आहे. नाशिकमध्ये तर त्यांनी महानगरपालिकेची निवडणूक जिंकून दाखवली होती. पुण्यात ,मुंबईत तसेच कल्याण डोंबिवलीमध्येही त्यांच्या बऱ्यापैकी जागा आल्या होत्या. या सर्व पार्श्वभूमीवर मनसेचा काही प्रमाणात का होईना भाजपला फायदा होऊ शकतो. आणि मुख्य म्हणजे शिवसेनेचा हक्काचा मतदार असलेला मुंबईतला मराठी माणूस, मनसे कडे वळवण्याची पूर्ण क्षमता राज ठाकरेंकडे आहे. राज ठाकरे हे प्रभावी वक्ते आहेत .त्यांच्या सभांना लाखोंची गर्दी होते. त्यामुळे भाजपला या निवडणुकीत राज ठाकरेंचा प्रचारासाठी चांगला उपयोग होऊ शकतो. कारण आजच्या तारखेला महाराष्ट्रातील भाजपाकडे फडणवीस सोडले तर एकही स्टार प्रचारक नाही. आणि ही निवडणूक जर भाजपला त्यांच्या हिशोबाप्रमाणे, म्हणजे ४५प्लस प्रमाणे जिंकायची असेल ,तर स्टार प्रचारकांची आवश्यकता आहे. आणि राज ठाकरे हे स्टार प्रचारक असल्यामुळे त्यांचा उपयोग करून घेण्यासाठी, भाजपा नेत्यांनी राज ठाकरेंना महायुतीत घेण्याचा निर्णय घेतला असावा.भाजपचा आजवरचा इतिहास पाहता आपल्या राजकीय फायद्यासाठी भाजपाने अशा अनेक तडजोडी केलेल्या आहेत. वास्तविक मनसेची परप्रांती विरोधी भूमिका भाजपाच्या नेत्याना तेव्हाही मान्य नव्हती आणि आताही मान्य नाही. परंतु कधीकधी काहीतरी मिळवण्यासाठी तडजोडी कराव्या लागतात. भाजपानेही राज ठाकरेंच्या मनसे बाबत तशीच तडजोड केलेली असावी. त्यामुळे मनसेला चूचकारण्याचे प्रयत्न सुरू झालेले आहेत .या लोकसभेच्या निवडणुकीत भाजपकडून मनसेला भलेही काही मिळालेले नसले, तरी विधानसभा आणि महापालिका निवडणुकीत भाजपचे बोट धरून मनसे महापालिका आणि विधानसभेच्या निवडणुकीत चांगली कामगिरी करू शकते .असा विश्वास राज ठाकरे यनाही आहे .आणि म्हणूनच त्यांनीही भाजपा बरोबर जाण्याचा विचार केला असावा. ज्यावेळी राज ठाकरे दिल्लीला गेले होते तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया अत्यंत बोलकी होती. शिंदे म्हणाले होते की राज ठाकरे आणि आम्ही एकाच विचाराचे आहोत. त्यामुळे मनसेला महायुतीत घेण्यात काहीही अडचण नाही. पण मनसेसाठी अजित पवार अडचणी निर्माण करू शकतात. कारण अजित पवार आणि राज ठाकरे यांचे कधीही जमले नव्हते. आणि यापुढेही जमणार नाही. पण अजित पवारांना आता महायुतीशी जुळवून घेण्यापलीकडे दुसरा मार्ग राहिलेला नाही. जर भाजपाने मनसेला महायुतीत घेण्याचा निर्णय घेतला, तर अजित पवार या निर्णयाच्या विरोधात जाऊ शकणार नाही. कारण त्यांचे हात दगडाखाली अडकलेले आहेत .आणि आता तर त्याचे संपूर्ण पवार कुटुंब त्यांच्या विरोधात उभे राहिलेले आहे .अशावेळी बारामती लोकसभा मतदारसंघातून त्याच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यासाठी अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात. हे सगळं पाहता मनसेची इंट्री महायुतीतील काही पक्षांना फायदेशीर ,तर काहींना नुकसानीची ठरू शकते.

error: Content is protected !!