ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामुंबई

धक्कादायक ! शिवसेना नेताच किरीट सोमययाचा खबरी असल्याचा खेडच्या नगराध्यक्षाचा गौप्यस्फोट

: मुंबई – सध्या शिवसेनेच्या काही नेत्यांवर भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या गंभीर आरोप करून त्यांना ईडी च्या तावडीत देण्याचा प्रयत्न करीत आहेत . मात्र सोमय्यानं येवढी माहिती कुठून मिळते याबाबत सगळ्यांनाच उत्सुकता होती .अखेर खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी याबाबतचा गौप्यस्फोट करताना या सगळ्या मागे रामदास कदम असल्याचे संगितले .रामदास कदम यांचा एक खास माणूस आणि सेनेचा कार्यकर्ता प्रसाद कर्वे यानेच आर टी आय च्या माध्यमातून माहिती कडून ती किरीट सोमय्या यांना पुरवली .त्यामुळेच बेहिशोबी मालमतेमधून अनिल परब यांचा दापोलीतील रिसॉर्ट उभा राहिला . त्याची माहिती सोमय्यानं देण्यात आली असे खेडेकर यांनी संगितले .मात्र रामदास कदम यांनी खेडेकर यांचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत . तर या घटनेमुळे कोकणातील शिवसेनेत मोठी खळबळ मजली आहे

error: Content is protected !!