ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
महाराष्ट्र

उल्हासनगरातील गोरगरीब नागरिक कोविड लसी पासुन वंचित . मनसेचा आरोप

.

उल्हासनगर / प्रतिनिधी : उल्हासनगर शहरात गेल्या दिड वर्षा पासून कोविड-१९ प्रार्दुभाव रोखण्यासाठी केलेल्या सततच्या बंद मुळे सामान्य नागरिकांचे आर्थिक बजेट पुर्णपणे कोलमडल आहे. या नागरिकांना स्वतःचा उदरनिर्वाह चालवणे कठीण झाले आहे. दरम्यान कोविड चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने मोफत लसीकरण सुरु केले आहे . परंतु या लसीचा साठा उल्हासनगर शहरात दिवसे दिवस कमी होत असल्याने या लसी गोर गरीब नागरिकाना मिळत नाहीत . असा आरोप मनसे शहर अध्यक्ष बंडु देशमुख यानी केला आहे. तर सदर लसी गरीबाना मोफत मिळाव्यात या करिता महापालिका आयुक्ताना त्यानी निवेदन देवुन लसीकरण सुरळीत करण्याची मागणी केली आहे .

उल्हासनगर शहरात महापालिकेने मोजकेच लसीकरण केंद्रे सुरु केली आहेत. ते ही दोन दोन दिवस बंद असतात . तर गोर-गरीब नागरिक ७८० रुपयाची लस बाहेरुन विकत घेऊ शकत नाही.आणि शासनाच्या आदेशा नुसार दोन्ही डोस घेतल्या शिवाय लोकल ट्रेन ने प्रवास करता येत नाही. तेव्हा या कोरोना महामारी मुळे गोर-गरीब नागरिकांची अशी अवस्था बिकट होऊन बसली आहे की आई जेवु घालत नाही आणि बाप भिक मागू देत नाही. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना उल्हासनगर शहराच्या वतीने निवेदन देवुन शासनाकडून पुरवठा केला जाणाऱ्या मोफत लसी या प्राधान्याने झोपडपट्टीतील गोर-गरिब व सामान्य नागरिकांना कशा देता येतील यासाठी त्वरित उपाययोजना करण्याची मागणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.उध्दवजी ठाकरे, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर व उल्हासनगर महानगर पालिकेचे आयुक्त मा. डॉ .राजा दयानिधी यांना निवेदनाद्वारे मनसेचे जिल्हा सचिव संजय घुगे,शहर अध्यक्ष बंडू देशमुख, शहर सचिव शालिग्राम सोनवणे यांनी केली आहे.

दरम्यान झोपडपट्टीतील बऱ्याच नागरिकांकडे मोबाईल सुध्दा नाहीत त्यामुळे त्यांच ऑनलाईन रजिस्ट्रेशन होत नाही . तर खाजगी रुग्णालयातुन विकत लस घेवु शकत नाही . तेव्हा अशा गोर-गरीब व सामान्य नागरिकांना प्राधान्याने लस कशी उपलब्ध होणार यासाठी सरकारने उपाययोजना कराव्यात अशी मागणी शहर अध्यक्ष बंडू देशमुख यांनी सरकार कडे केली आहे.कारण सरकारी लस ऑनलाईन असल्यामुळे आजही गोर-गरीब नागरिकांपर्यंत पोचली नाही.तेव्हा या गोर गरीबाना मोफत लस मिळावी अशी व्यवस्था शासन व महापालिकेने करावी अशी मागणी ही मनसेने केली आहे .सदर निवेदन देताना जिल्हा सचिव संजय घुगे, शहर अध्यक्ष बंडू देशमुख, शहर सचिव शालिग्राम सोनवणे, उपशहर अध्यक्ष सचिन बेंडके, मुकेश सेठपलानी, मनविसेचे तन्मेश देशमुख उपस्थित होते.

error: Content is protected !!