[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहापालिकामुंबई

पालिकेचे कार्यकारी अभियंता डाॅ. विशाल ठोंबरे यांनी विकसित केलेले तंत्रज्ञानाचा वापर

मुंबईतील रस्त्यांचा हिट फॉर्म्युला पालिका वापरनार

मुंबई : मुंबई महापालिकेच्या अभियंत्याने विकसित केलेले अल्ट्रा थिन व्हाइट टॉपिंग हे तंत्रज्ञान देशात अव्वल ठरले आहे. पालिकेचे कार्यकारी अभियंता डाॅ. विशाल ठोंबरे यांनी हे तंत्रज्ञान विकसित केले आहे. यात रस्त्याचा पाया डांबरी रस्त्याप्रमाणे बनवता येतो, तसेच वरील भाग काँक्रीटचा असतो. आयआयटी मुंबईतून पीएच.डी. करीत असताना ठोंबरेंनी या तंत्रज्ञानावर शोध निबंध लिहिला. त्यानंतर पालिकेने या पद्धतीने रस्ते बनवणे सुरु केली.  

हे तंत्रज्ञान प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेसाठी वापरले जाणार आहे. यापूर्वी गुजरात, चन्नई व राजस्थान या राज्यांमध्येही हे तंत्रज्ञान वापरण्यात आले होते, तर आता बिहार आणि त्रिपुरा सरकारने याबाबत माहिती जाणून घेण्यासाठी मुंबई पालिकेशी संपर्क साधला आहे.  

error: Content is protected !!